aage badh raha hai dhruv jurel brilliance of mind to dismiss olie pope on kuldeep yadav bowling in ind vs eng 5th test  twitter
Sports

Dhruv Jurel Stumping: 'पुढे जातोय बघ..' ,ध्रुव जुरेलचा तो एक कॉल अन् ओली पोपचा 'करेक्ट कार्यक्रम' -Video

India vs England 5th Test: चौथ्या कसोटीत त्याने ९० आणि ३९ धावांची खेळी केली होती. यादरम्यान तो त्याने घेतलेल्या रनआऊटमुळेही चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा यष्टीमागे त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे.

Ankush Dhavre

Dhruv Jurel - Olie Pope Stumping:

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. पदार्पण केल्यापासूनच संघासाठी शानदार कामगिरी करतोय. त्याने राजकोट कसोटीत ४६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर चौथ्या कसोटीत त्याने ९० आणि ३९ धावांची खेळी केली होती. यादरम्यान तो त्याने घेतलेल्या रनआऊटमुळेही चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा यष्टीमागे त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे.

ध्रुव जुरेलला भविष्यातील एमएस धोनी असं म्हटलं जातं आहे. त्याला धोनीचा उत्तराधिकारी का म्हटलं जातंय याचं प्रत्यय तो मैदानावर दमदार कामगिरी करुन देतोय. धोनी आपल्या चाणाक्ष बुद्धीसाठी देखील ओळखला जायचा. असाच काहीसा प्रत्यय इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या शेवटच्या कसोटीत पाहायला मिळाला आहे.

ध्रुव जुरेलला आधीच अंदाज आला होता की, फलंदाजी करत असलेला ओली पोप कधी पुढे जाईल. कुलदीपने त्याला बाद केलं. मात्र त्याला बाद करण्यात ध्रुव जुरेलचा मोलाचा वाटा आहे. नेमकं काय घडलं समजून घ्या.

ज्यावेळी ओली पोप २३ चेंडूत ११ धावांवर फलंदाजी करत होता त्यावेळी ध्रुव जुरेल अंदाज आला होता की, ओली पोप शॉट खेळण्यासाठी पुढे जाणार आहे. हा चेंडू टाकण्याआधीच ध्रुव जुरेलने कुलदीप यादवला इशारा केला होता की, पोप पुढे जाऊन शॉट मारणार आहे. त्यावेळी कुलदीपने आपल्या लाईन आणि लेंथमध्ये बदल केला आणि ओली पोपला यष्टीचीत केलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कुलदीपने घेतल्या ५ विकेट्स..

या सामन्यातील पहिल्या डावात कुलदीप यादवने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे. त्याने पहिल्या डावात त्याने ५ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. या डावात झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्सला बाद केलं. बेन स्टोक्सला शून्यावर बाद करुन त्याने आपलं पंचक पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

SCROLL FOR NEXT