cricket twitter
Sports

Cricket Facts: न भूतो न भविष्यति... क्रिकेटमध्ये एकाच वेळी 11 खेळाडूंना दिली मॅन ऑफ द मॅच

Man Of The Match Award: क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार दिला जातो. मात्र क्रिकेटमध्ये एकाच वेळी संपूर्ण संघालाही सामनावीर पुरस्कार दिला गेला आहे.

Ankush Dhavre

क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार दिला जातो. एखाद्या गोलंदाजाने जास्त विकेट्स घेतल्या किंवा एखाद्या फलंदाजाने सर्वाधिक धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला, की त्याचा सामनावीर पुरस्काराने सन्मान केला जातो. हा पुरस्कार कुठल्याही एकाच खेळाडूला दिला जातो.

मात्र एकाच सामन्यात एकाच वेळी ११ खेळाडूंना सामनावीर पुरस्कार दिला गेल्याचं तुम्ही ऐकलंय का?क्वचितच ऐकलं असेल. मात्र हे एकदा नाहीतर ३ वेळा घडलं आहे. केव्हा घडलं? आणि का ११ खेळाडूंना सामनावीर पुरस्कार दिला गेला? जाणून घ्या.

न्यूझीलंड विरुद्ध वेस्टइंडीज

क्रिकेटमध्ये वेस्टइंडीज आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान पहिल्यांदाच ११ खेळाडूंना सामनावीर पुरस्कार दिला गेला होता. १९९६ मध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने शानदार कामगिरी करत वेस्टइंडीजवर ४ धावांनी विजय मिळवला होता. हा सामना जिंकून देण्यात ४ फलंदाज आणि ५ ६ गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यावेळी न्यूझीलंडला पराभूत करणं खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे संपूर्ण संघाला सामनावीर पुरस्कार दिला गेला होता.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड

पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये १९९६ मध्ये झालेल्या सामन्यातही एकाच सामन्यात ११ खेळाडूंना सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला २ गडी राखून पराभूत केलं होतं.

या सामन्यात इंग्लंडला पराभूत करण्यासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी समान योगदान दिलं होतं. सर्व गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या होत्या. तर सर्व फलंदाजांनी धावा केल्या होत्या. पाकिस्तानची सांघिक कामगिरी पाहता संघातील सर्व खेळाडूंना सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका

क्रिकेटमध्ये एकाच वेळी संपूर्ण संघाला सामनावीर पुरस्कार देण्याची तिसरी घटना १९९९ मध्ये घडली. वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्टइंडीजवर ३५१ धावांनी विजय मिळवला होता. या सांघिक कामगिरीनंतर संपूर्ण संघाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

सामनावीर खेळाडूची निवड कशी केली जाते?

सामनावीर पुरस्कार हा संपूर्ण सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. जो खेळाडू आपल्या संघाकडून खेळताना संघाच्या विजयात मोलाचं योगदान देतो, त्यालाच सामनावीर पुरस्कार दिला जातो. एकदा- दोनदाच पराभूत झालेल्या संघातील खेळाडूला हा पुरस्कार दिला गेल्याची घटना घडली असावी.

जर एखाद्या गोलंदाजाने वनडे क्रिकेटमध्ये ३ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या, तर त्याचा १ विकेट हा ४० धावांच्या बरोबरीचा मानला जातो. जर टी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाने ३ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या, तर त्याचा १ विकेट हा २० धावांच्या बरोबरीचा समजला जातो. जर कुठल्या फलंदाजाने कमी धावा केल्या असतील तर गोलंदाजाला सामनावीर पुरस्कार दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT