IND vs BAN Test Series: टीम इंडियात नव्या खेळाडूंची एन्ट्री; कोण आहे यश दयाल? जाणून घ्या सर्वकाही

IND vs BAN Test Series: बीसीसीआयने नुकतीच भारत-बांगलादेशमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केलीय. या संघात वेगवान गोलंदाज यश दयालचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
IND vs BAN Test Series: टीम इंडियात नव्या खेळाडूंची एन्ट्री; कोण आहे यश दयाल?  जाणून घ्या सर्वकाही
Published On

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेशविरुद्ध १९ सप्टेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केलीय. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने नुकताच भारतीय संघ जाहीर केलाय. वेगवान गोलंदाज यश दयालचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. जसप्रीत बुमराहलाची पहिल्या कसोटीसाठी निवड करण्यात आलीय.

संघ निवड समितीने बांगलादेश विरुद्धात होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारताच्या १६ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला. भारत-बांगलादेशमधील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरला खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरला कानपूर येथे होणार आहे. भारत आणि बांगलादेशात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. दुसरी आणि तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ कसा असेल? कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल याबाबत अद्याप कोणती माहिती जाहीर करण्यात आली नाहीये.

भारत-बांगलादेशातील संघात पहिला कसोटी सामना चेन्नई येथे होणार आहे. या पहिला कसोटी सामन्यासाठी बीसीसआयने १६ सदस्य असलेली भारतीय संघाची घोषणा केलीय. यात यष्टीरक्षक ऋषभ पंत, केएल राहुल, आणि सरफराज खानला संधी देण्यात आली नाहीये. दरम्यान निवड करण्यात आलेल्या भारतीय संघात ४ फिरकीपटू गोलंदाज आणि जलदगती गोलंदाजांचा समावेश करण्यात आलाय. दोन यष्टीरक्षकासह एकूण ८ फलंदाजांचा समावेश या संघात करण्यात आलाय. विशेष म्हणजे या संघात पहिल्यांदाच जलदगती गोलंदाज यश दयाल याची निवड झालीय.

टीम इंडियात पहिल्यांदा संधी मिळवणारा जलद गती गोलंदाज यश दयालचा क्रिकेट प्रवास खूप जबरदस्त राहिलाय. आयपीएल २०२३ मध्ये एकाच षटकात ५ षटकारांचा मार खाणाऱ्या यश दयाल प्रवास जाणून घेऊ. उत्तर प्रदेशासाठी प्रथम श्रेणीचं क्रिकेट खेळणाऱ्या यश दयालने आयपीएलमध्ये सहभाग घेतला होता. २०२३ मध्ये तो गुजरात टायटन्स संघाचा खेळाडू होता. या आयपीएलमध्ये यश दयालला मोठा मार खावा लागला होता.

कोलकाता नाइटरायडर्स संघाचा खेळाडू रिंकू सिंहने अखेरच्या षटकात यशला जोरदार चोप दिला होता. रिंकूने त्याच्या एकाच षटकात ५ षटकार मारले. प्रथम श्रेणीत सामने खेळणाऱ्या गोलंदाजाला मिळालेल्या प्रसादाने यश गोंधळला. आयपीएलमध्ये जोरदार पिटाई झाल्यानंतर यश आजारी पडला होता. त्यामुळे यशचं वजन थेट ६ किलोने कमी झालं होतं. आयपीएलमध्ये षटकारांचा प्रसाद मिळाल्यानंतर त्याच्या करिअरवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com