Manasvi Choudhary
आजकाल मधुमेह ही समस्या सामान्य बनली असली तरी याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मधुमेहाच्या रूग्णांनी खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात नेमके कोणते बदल केले पाहिजेत हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
किचनमधील काही सोप्या उपायांनी तुम्ही रक्तातील साखेवर नियंत्रण मिळवू शकता. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी किचनमधील कोणत्या ५ गोष्टी उपयुक्त आहेत ते या वेबस्टोरीतून सांगणार आहे.
दालचिनीमध्ये इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारवण्याचे गुणधर्म आहेत ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येते. सकाळी रिकाम्या पोटी दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिक्स करून प्या.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथीचे दाणे फायदेशीर आहेत. मेथीचे दाणे रात्री एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी गाळून प्या
आले आणि लसूण शरीरातील जळजळ कमी करतात आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. जेवणात मसाल्यांमध्ये किंवा आल्याचा चहा आणि लसणाची चटणी चा समावेश करा.
कडुनिंबाची पाने रक्तातील विषारी घटक बाहेर टाकून साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. सकाळी कडुनिंबाची २-३ पाने स्वच्छ धुवून त्याची पेस्ट पाण्यात मिक्स करून प्या.
आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करण्यास मदत करते. सकाळी आवळ्याचा रस किंवा आवळा पावडर कोमट पाण्यात मिक्स करून प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.