Romario Shepherd News  Saam tv
Sports

Romario Shepherd : नाद करायचा नाय आमचा! पठ्ठ्याने एका चेंडूत कुटल्या २० धावा, एका पाठोमाग ३ षटकार, VIDEO

Romario Shepherd News : शेफर्डने एका चेंडूत कुटल्या २० धावा कुटल्या. एका पाठोमाग ३ षटकार लगावले.

Vishal Gangurde

रोमारियो शेफर्डने ३४ चेंडूत ७३ धावा करत शानदार खेळी

एका चेंडूत २० धावा घेत ऐतिहासिक क्षण

गुयाना अमेजन वॉरियर्सने २०३ धावांचे लक्ष्य

सेंट लूसिया किंग्सने १८.१ षटकांत लक्ष्य गाठत सामना ४ गडी राखून जिंकला

Caribbean Premier League 2025: कॅरिबियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये सेंट लूसिया किंग्स आणि गुयाना अमेजन वॉरियर्समध्ये धमाकेदार सामना झाला. या स्पर्धेत आरसीबीचा स्टार खेळाडू रोमारियो शेफर्ड हा गुयाना अमेजन वॉरियर्स टीमचा भाग आहे. या सामन्यात रोमारियोची जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. रोमारियाने एका चेंडूत २० धावा कुटल्या. तर त्याने एका पाठोपाठ ३ षटकार लगावले. आक्रमक खेळीनंतरही रोमारियाच्या गुयाना अमेजन वॉरियर्सला पराभवाचा सामना करावा लागला.

गुयाना अमेजन वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुयाना अमेजन वॉरियर्ससाठी रोमारिया शेफर्डने ३४ चेंडूत सर्वाधिक ७३ धावा कुटल्या. शेफर्डने फलंदाजी करताना ५ चौकार आणि ७ षटकार लगावला. शेफर्डने १५ व्या षटकात ओसेन थॉमसच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली.

थॉमसने ओव्हरचा दुसरा चेंडू वाइड टाकला. त्यानंतर पुन्हा नो बॉल टाकला. या नो बॉलवर षटकार लगावला. त्यानंतर आणखी एक नो बॉल टाकला. त्यावरही षटकार लगावला. पुढे थॉमसने व्यवस्थित बॉल टाकला. मात्र, शेफर्डने त्यावरही खणखणीत षटकार लगावला. जोरदार फलंदाजी करत शेफर्डने त्या एका चेंडूत २० धावा कुटल्या.

शेफर्डच्या संघाने दिलेल्या २०३ धावांचं लक्ष्य सेंट लूसिया किंग्सने अवघ्या १८.१ षटकात ६ गडी गमावून गाठलं. सेंट लूसिया किंग्सकडून फलंदाजी करताना एकीमने ३५ चेंडूत ७३ धावा कुटल्या. एकीमने ६ चौकार आणि ४ षटकार लगावले. तर टिम शेफर्टने ३७, टिम डेविडने २५ धावा कुटल्या. सेंट लूसिया किंग्सने ४ गडी राखून सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शनमोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

Manoj Jarange Patil: हवं तर गोळ्या घाला’; जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, सरकारवर आडकाठीचा आरोप

Apple Devices: IPhone 17 लॉंच होताच, बंद होणार अ‍ॅप्पलचे 'हे' डिव्हाईस

SCROLL FOR NEXT