
गणेश चतुर्थी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने साजरा होणारा सण
प्रियजनांना भक्तीमय मराठी शुभेच्छा पाठवा
सोशल मीडियासाठी खास Marathi Wishes, Quotes, Status आणि Captions
WhatsApp, Facebook, Instagram वर शेअर करता येणारे आकर्षक संदेश
देशभरात बुधवार २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी धुमधडाक्यात साजरी होणार आहे. सार्वजनिक मंडळ, घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी ढोल ताशाच्या गजरात १० दिवस गणेशोत्सव साजरा होईल.
गणेशोत्सव मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवात १० दिवस मोठा उत्साह पाहायला मिळतो. या खास गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या कास प्रियजनांना खास दिवसाच्या शुभेच्छा द्या.
गणपती बाप्पा मोरया!
सुख, शांती आणि समृद्धी तुमच्या जीवनात नांदो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
विघ्नहर्त्याच्या आगमनानं तुमचं घर मंगलमय होवो,
प्रत्येक क्षण आनंदात जावो.
गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
लाडक्या गणरायाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
आरोग्य, यश, सुख आणि शांती लाभो!
तुम्हाला शुभ गणेश चतुर्थी!
भगवान सिद्धिविनायकाची कृपा सदैव तुमच्यावर राहो.
आयुष्य साजरं आणि सुफळ संपूर्ण होवो. याच गणेश चतुर्थीनिर्मित प्रेमळ शुभेच्छा!
लाडका गणपती बाप्पा तुमच्या जीवनात
यश, प्रेम, सौख्य आणि समाधान घेऊन येवो.
गणपती बाप्पा येतोय, आनंद घेऊन येतोय,
सर्व घरात दिवाळी साजरी होईल अशी त्याची कृपा असो!
शुभ गणेश चतुर्थी
श्री गणेशाची पूजा करा, विघ्न दूर करा,
आयुष्य सुखमय बनवा!
तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणरायाचं पावन रूप, प्रसन्न मन,
तुमच्या जीवनात येवो नवीन वळण.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
सण साजरा करा मनापासून,
बाप्पाच्या चरणी ठेवावा प्रत्येक संकल्प पूर्ण!
तुम्हाला गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
मूषकावर आरूढ होऊन,
विघ्नहर्ता येतो घरात,
प्रेम, श्रद्धा आणि भक्तीने करा त्याचे स्वागत!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.