Ganesh Festival : गॅरंटी कार्डसह बाप्पांच्या मातीच्या मूर्ती; विक्रेत्यांकडून पैसे परत करण्याची मिळतेय हमी

Wardha News : पीओपीच्या मूर्तीमुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो. विरघळत नसलेल्या मूर्तीचे अवशेष नदीपात्रात पाहायला मिळतात. मातीच्या मूर्ती पाण्यात विरघळतात आणि त्या मातीचा पुनर्वापरही करता येत नाही
Ganesh Festival
Ganesh FestivalSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: सध्याचा जमाना गॅरंटी, वॉरंटीचा. पण, अनेक वस्तूंबाबत गॅरंटी, वॉरंटी मिळत नाही. अशा स्थितीत वर्ध्यात मातीपासून तयार केलेल्या बाप्पांच्या मूर्ती गॅरंटी कार्डसह विक्रीस उपलब्ध आहेत. मागील अकरा वर्षांपासुन वैद्यकीय जनजागृती मंचमार्फत निर्माल्य कुंडात विसर्जित केलेल्या मूर्तिपासुन पुन्हा रिसायकल करून मूर्ती तयार केल्या जातं आहे. इतकेच नाही तर मूर्ती न विरघळल्यास पैसे परत देण्याची हमी देण्यात येत आहे. 

गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर आला आहे. यामुळे बाजारात सध्या गणेशाच्या वेगवेगळ्या मूर्ती उपलब्ध आहे. प्रामुख्याने पीओपीपासून तयार केलेल्या आकर्षक अशा गणेश मूर्ती पाहण्यास मिळत आहे. तर अनेक जण मातीपासून मूर्ती तयार करत असतात. असे असले तरी त्याबाबत गॅरंटी मात्र कुणी देताना दिसत नाही. पण, वर्ध्यातील गजानन भांगे हे मूर्तीकार गणेश मूर्तीसोबत गॅरंटी कार्ड म्हणजेच हमीपत्रही देत आहेत. 

Ganesh Festival
Pachora Crime : बँकेतून काढलेली रक्कम गाडीच्या डिक्की ठेवली; गाडी घराबाहेर लावताच चोरट्यांनी साधला डाव, चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

पैसे परत करण्याची हमी 

गजानन भांगे यांच्या असलेल्या मूर्ती शंभर टक्के मातीपासूनच तयार केल्या असून त्यामध्ये पीओपी किंवा जलस्त्रोत दुषित करणारा घटक नसल्याची हमी दिली जात आहे. तसं आढळल्यास पैसे परत करण्याची हमीही मूर्तीकार गजानन भांगे देत आहेत. या मातीच्या मूर्ती भाविकांच्याही पसंतीला उतरत आहे. नागरिकही मूर्तीच्या नोंदणीला प्रतिसाद देत असून मुर्त्या कमी पडत आहे. सर्वांनी मातीची मूर्ती वापरावी, असं आवाहन करण्यात आलंय.

Ganesh Festival
Accident News : बसची जोरदार धडक, प्रवासी वृद्धाचा मृत्यू; यवतमाळच्या दारव्हा बसस्थानक आवारातील घटना

मूर्तींचे कृत्रिम कुंडात संकलन 

दरम्यान भांगे यांचा मागील अकरा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. वर्ध्यातील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने शहरातील मूर्तीच कृत्रिम कुंडात संकलन केलं जात. त्यात पीओपीच्या वेगळ्या आणि मातीच्या मूर्ती वेगळ्या कुंडात विसर्जीत करण्याची सुविधा केली जाते.  विसर्जीत होणाऱ्या मूर्तीची माती पुन्हा मूर्तीकारांना मूर्ती तयार करण्यासाठी दिली जाते. यातून पर्यावरण संवर्धनासही हातभार लागत आहेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com