Nandurbar Ganesh Festival : साचा न वापरता काळ्या मातीने साकारतात गणराय; १३१ वर्षाची परंपरा आजही कायम

Nandurbar News : नंदुरबार शहरातील अनोखा असलेला श्रीमंत बाबा गणपतीचा हा भक्तिमय परिसर बघण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासह धुळे, गुजरात आणि मध्य प्रदेशमधूनही हजारो भाविक मोठ्या संख्येने येतात
Nandurbar Ganesh Festival
Nandurbar Ganesh FestivalSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : लोकमान्य टिळकांनी १८६३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्याच परंपरेला पुढे नेत नंदुरबार शहरात १८९४ पासून श्री श्रीमंत बाबा गणपती मंडळाने गणेशोत्सवाला सुरुवात केली. विशेष म्हणजे या मंडळाची गणपती मूर्ती दरवर्षी काळ्या मातीचा वापर करून कार्यकर्ते हाताने तयार करत त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. 

पुणे- मुंबईप्रमाणेच नंदुरबारचा हा गणपतीही आपल्या अनोख्या आणि जुन्या परंपरेमुळे प्रसिद्ध आहे. गणपतीच्या स्वागतासाठी सुरू असलेली ही मेहनत खऱ्या अर्थाने भक्तीची गाथा सांगते. नंदुरबारच्या श्रीमंत बाबा गणपती मंडळाची हि १३१ वर्षांची परंपरा आजही अबाधित आहे. यात प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या परीने काम पूर्ण करत सहभाग नोंदवत असतो. 

Nandurbar Ganesh Festival
Buldhana Crime News : जुन्या वैमनस्यातून एकाची भररस्त्यात हत्या; रायपूर पोलिसांकडून तिघांना अटक

काळी माती, शाडू माती व कापसाचा वापर 

मूर्ती साकारण्यासाठी कोणत्याही साच्याचा वापर करून बनवलेली नसते. तर शेतातून आणलेल्या काळ्या माती, शाडू माती आणि कापूस यांचा वापर करून ती हाताने साकारली जाते. मंडळाचे सुमारे २०० कार्यकर्ते आपापले दैनंदिन काम संपवून या कामासाठी एकत्र येतात. गणेश चतुर्थीच्या पंधरा दिवस आधी, संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पाटपूजन करून मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात होते.

Nandurbar Ganesh Festival
Dengue : जळगाव जिल्ह्यात २७ जणांना डेंग्यू रुग्ण; चार दिवसात वाढली रुग्ण संख्या

पंधरा दिवसात साकारली जाते मूर्ती 

मंडळाचे कार्यकर्ते श्रद्धेने आणि मेहनतीने मूर्तीला आकार देतात. तब्बल पंधरा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मूर्ती तयार होते. त्यानंतर तिला रंग दिला जातो आणि विविध दागिन्यांनी सजवले जाते. श्रीमंत बाबा गणपतीचा हा भक्तिमय परिसर बघण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासह धुळे, गुजरात आणि मध्य प्रदेशमधूनही हजारो भाविक मोठ्या संख्येने येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com