Dengue : जळगाव जिल्ह्यात २७ जणांना डेंग्यू रुग्ण; चार दिवसात वाढली रुग्ण संख्या

Jalgaon News : रुग्णांची संख्या वाढली असून जिल्ह्यातून चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या २८३ नमुन्यांपैकी २७ रुग्णांना डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाले आहे
Dengue
Dengue Saam tv
Published On

जळगाव : पावसाळा सुरु झाल्यानंतर डेंग्यू, मलेरिया सारख्या साथरोगांचा फैलाव झपाट्याने होत असतो. त्यानुसार जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसानानंतर डेंग्यूने डोके वर काढले आहे. डेंग्यूच्या साथरोगाचा झपाट्याने फैलाव होत असल्याचे पाहण्यास मिळत असून मागील चार दिवसात जिल्ह्यात २७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.  

जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात साथरोगाचे रुग्ण वाढले आहेत. थंडी, ताप, सर्दीचे तुंगना वाढले असल्याचे डेंग्यूची लक्षण असलेल्या रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णालयात देखील गर्दी होत आहे. त्यातच जिल्ह्यातून चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या २८३ नमुन्यांपैकी २७ रुग्णांना डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाले आहे. 

Dengue
Kolhapur : परमेश्वराचे बोलावणे, ८ सप्टेंबरला देहत्याग करण्याची २० भाविकांची भूमिका; प्रशासनात खळबळ

चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण 

जळगाव जिल्ह्यात गेल्या २२ दिवसात ३९ जणांना डेंग्यू झाल्याचे जिल्हा हिवताप विभागाकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये  जामनेर तालुक्यात ४, अमळनेर २, चाळीसगाव १५, भुसावळ २, बोदवड, रावेर, चोपडा, आणि जळगाव शहरात प्रत्येकी एका रुग्णाला डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे. तर डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. 

Dengue
Buldhana Crime News : जुन्या वैमनस्यातून एकाची भररस्त्यात हत्या; रायपूर पोलिसांकडून तिघांना अटक

रुग्णालयात मोठी गर्दी 

दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर हिवताप विभागाकडून चाळीसगाव शहरासह जामनेर तालुक्यातील ज्या गावात रुग्ण आढळून आले आहेत. त्या रुग्णांच्या गावात डास शोध मोहिम राबविण्यात देण्यात आले आहे. शिवाय रुग्णालयात देखील मागील आठवड्यापासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com