Paduka Darshan Sohala Saam tv
आध्यात्मिक

Paduka Darshan Sohala : पादुका दर्शन सोहळ्याची सांगता; उत्सवात संत आणि सद्गगुरुंच्या पादुकांवर भाविक लीन

Paduka Darshan Sohala update : नवी मुंबईतील पादुका दर्शन उत्सवाला हजारो भाविकांचा प्रतिसाद मिळाला. या सोहळ्याची सांगता प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या भक्मिमय सुरांनी झाली.

Vishal Gangurde

Paduka Darshan Sohala in navi mumbai :

राज्यभरातील हजारो भाविकांना दोन दिवस संत आणि सद्गगुरुंच्या पादुकांवर चरणी लीन होण्याचा योग आला. नवी मुंबईतील पादुका दर्शन उत्सवाला हजारो भाविकांचा प्रतिसाद मिळाला. या सोहळ्याची सांगता प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या भक्मिमय सुरांनी झाली. (Latest Marathi News)

नवी मुंबईत 'सकाळ माध्यम समुहातर्फे' श्री फॅमिली गाइड प्रोग्रॅम अंतर्गत आयोजित दोन दिवस 'श्री गुरु पादुका दर्शन उत्सव' हा सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावली. या भाविकांना संत आणि सद्गुरुंचा पादुकांच्या जवळून नतमस्तक होता आलं. पादुका दर्शनानंतर भाविकांच्या डोळ्यात तृप्तीचे भाव होते.

माऊलींच्या पादुकांवर नतमस्तक होत भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाली. या सोहळ्याला दोन दिवस दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. संत-महात्म्यांच्या पादुका दर्शनाची आस मनात ठेवून आलेल्या भाविकांमुळे परिसरात भावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. या सोहळ्यात भाविकांना वारकऱ्यांच्या दिंड्या देखील पाहायला मिळाल्या. या वेळी सासवड, जेजुरी, आळंदी, पंढरपूर,पुणे, रायगड, कोल्हापूर, मावळ या भागातून अनेक दिंड्या दाखल झाल्या होत्या.

श्रीगुरुंच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून पादुकांचे दर्शन घेतले. सोहळ्यात सर्व गुरुसेवकांना पादुका दर्शनाची संधी मिळाली. दर्शनानंतर 'सोनियाचा दिवस' असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. यावेळी प्रत्येक गुरुसेवकांनी कुटुंबासमवेत पादुका दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर परत जाताना वेगळीच उर्जा आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

गुरुंचे महत्व कळाले...

पादुका दर्शन सोहळ्याची सांगता प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुरांनी झाली. या सोहळ्यात 'श्री फॅमिली गाइड प्रोग्रॅम'च्या चीफ क्युरेटर स्टेफिनी फाईट यांनी गुरुंविषयी विचार विशद केले. 'संतुलन आयुर्वेद'चे एमडी सुनील तांबे यांनी उपस्थिातांना महत्वाची माहिती सांगितली.

तसेच यावेळी 'एपी ग्लोबाले'चे संस्थापक आणि 'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांचंही मार्गदर्शन उपस्थित मंडळींना लाभले. ' विश्व फाउंडेशन'चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले, आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी भाविकांना अध्यात्माचा संदेश दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT