Ganesh Chaturthi 
आध्यात्मिक

Jyotish Shastra: या 3 राशींवर गणपती बाप्पांची असते विशेष कृपा; वाढेल बुद्धिमत्ता आणि संपत्ती

Ganesh Chaturthi : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार तीन राशीच्या लोकांवर नेहमी गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद असतो. या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची उपासना केल्याने भक्तांना इच्छित परिणाम मिळू शकतात. त्या राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

Bharat Jadhav

सनातन धर्मातील लोकांसाठी श्रीगणेशाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. सर्व देवी-देवतांमध्ये गणेशाचे प्रथम स्थान आहे. त्यामुळे त्यांची पूजा केल्यानंतरच इतर देवांची पूजा केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार जे लोक श्रीगणेशाची भक्ती भावनेने पूजा करतात त्यांचे सर्व दु:ख, वेदना गणराया हरण करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी देवाची पूजा केल्याने साधकाला विशेष फळ मिळते.

दरवर्षी गणेश चतुर्थी उत्सव भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी तिथीला सुरू होतो. तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपतो. यावेळी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी आणि 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशीचा सण साजरा केला जाणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी तीन राशींवर नेहमी गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद असतो. जे भाविक श्री गणेशाची पूजा मनोभावे करतात, गणराया त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. आज आपण अशा तीन राशींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा असते.

मिथुन

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, जो गणेशाची देवता आहे. यामुळे या राशीच्या लोकांवर श्री गणेशाची कृपा सदैव राहते. मिथुन राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची योग्य प्रकारे पूजा केली तर त्यांना जीवनात अपार यश मिळू शकते. यासोबतच आरोग्य आणि मानसिक समस्यांपासूनही त्यांना आराम मिळण्याची शक्यता आहे.

कर्क

चंद्र देव बुध ग्रहाचा पिता आहे आणि कर्क चंद्राचे चिन्ह आहे. कर्क राशीच्या लोकांना नेहमी चंद्र देवाचा आशीर्वाद असतो. यामुळे कर्क राशीच्या लोकांनी गणेशाची नियमित पूजा केल्यास त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. भगवान गणेशाच्या आशीर्वादाने, कर्क राशीच्या लोकांची बुद्धिमत्ता आणि कौशल्ये विकसित होण्याची अधिक शक्यता असते.

कन्या

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह देखील आहे, जो श्री गणेशचे देवता आहेत. यामुळे कन्या राशीच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. पण यासाठी त्यांना या पवित्र दिवशी गणेशाची पूजा करावी लागणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भक्ताने गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास देव त्याचे सर्व संकट दूर करतात. तसेच जीवनात सदैव समृद्धी, सुख, शांती आणि ऐश्वर्य मिळण्याचा आशीर्वाद देतात.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

SCROLL FOR NEXT