Bhaubeej 2025 muhurat google
आध्यात्मिक

Bhaubeej 2025 : या वेळेत भाऊबीज करणं टाळा, वाचा राहुकाळा मुहूर्त आणि ओवाळणीच्या टिप्स

Rahu Kaal 23 October Muhurta : भाऊबीज 2025 यंदा 23 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. जाणून घ्या राहुकालाची वेळ, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवशी करावयाचे धार्मिक उपाय आणि परंपरा.

Sakshi Sunil Jadhav

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला दरवर्षी भाऊबीज साजरी केली जाते. या वर्षी भाऊबीजचा पवित्र सण 23 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. भाऊबीजला यमद्वितीया, भाऊ द्वितीया, भाऊ बीज आणि भातरू द्वितीया अशा विविध नावांनीही ओळखले जाते. या शुभ दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर भाऊ आपल्या बहिणींना प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात.

द्रिक पंचांगानुसार यंदा भाऊबीजेच्या दिवशी राहुकाळाची छाया राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाळा हा अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य टाळावे असे सांगितले जाते. त्यामुळे या काळात भावाला ओवाळणे टाळावे, असे तज्ज्ञ सांगतात.

राहुकाळाची वेळ

द्रिक पंचांगानुसार 23 ऑक्टोबर रोजी राहुकाल दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरू होऊन 2 वाजून 54 मिनिटांनी संपेल. या काळात कोणतेही पूजन किंवा शुभ काम करू नये.

भाऊबीजचे शुभ मुहूर्त (Bhaubeej 2025 Shubh Muhurat)

पहिला शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 13 मिनिटांपासून 3 वाजून 28 मिनिटांपर्यंत राहील.

दुसरा अभिजित मुहूर्त सकाळी 11 वाजून 43 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 28 मिनिटांपर्यंत असेल.

तिसरा विजय मुहूर्त दुपारी 1 वाजून 58 मिनिटांपासून 2 वाजून 43 मिनिटांपर्यंत राहील.

तर चौथा गोधूली मुहूर्त सायंकाळी 5 वाजून 43 मिनिटांपासून 6 वाजून 09 मिनिटांपर्यंत असेल.

भाऊबीज पूजन विधी (Bhaubeej 2025 Pujan Vidhi)

या दिवशी सकाळी भावाने प्रथम चंद्रदर्शन करून यमुनेच्या पाण्याने किंवा स्वच्छ पाण्याने स्नान करावे. त्यानंतर बहिणीच्या घरी जाऊन तिच्या हातचे भोजन ग्रहण करावे. बहिणीने भावाला टिळा लावून ओवाळणी करावी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. भावाने बहिणीला आपल्याकडून भेटवस्तू द्यावी.

भाऊबीजचे उपाय (Bhai Dooj Upay)

भाऊबीजेला ओवाळणी करताना बहिणीने भावाच्या कपाळावर चंदन किंवा केशराचा टिळआ लावल्यास त्याच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तसेच या वेळी यमाचा दिवा पेटवला तर अकाल मृत्यूचे भय नाहीसे होते, असा धार्मिक समज आहे. भाऊबीज हा भावंडांच्या प्रेमाचे आणि स्नेहबंधाचे प्रतीक आहे. या सणादिवशी शुभ मुहूर्तात केलेली ओवाळणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी मंगलकारी ठरते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री, तस्करीचं मोठं रॅकेट उघड; भंडारा हादरले

पवार कुटुंब दिल्लीत, विलिनीकरणाला वेग? सुनेत्रा पवारांनी घेतली मोदी-शाहांची भेट

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा; अध्यक्ष निवडीचा मुहूर्तही ठरला?

अजितदादांची राजकीय हत्या? रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ, VIDEO

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना छत्रपती शिवराय अन् बाळासाहेब ठाकरेंचा विसर; किशोरी पेडणेकर यांचा जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT