Relationship Tips: सणासुदीला नवरा-बायकोमध्ये भांडणं का होतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Festive Stress: सणाच्या वेळी नवरा-बायकोमध्ये भांडणाचे मुख्य कारण म्हणजे फेस्टिव्ह स्ट्रेस. घरातील काम, खर्च, सोशल मीडिया दबाव आणि वेळेची कमतरता यावर उपाय जाणून घ्या.
Festive Stress
Relationship Tipsgoogle
Published On

प्रत्येक सण हा आनंदाचा, उत्साहाचा आणि गोड नाती जपण्याचा असतो. प्रत्येक घरांमध्ये सणावारांना सगळं कुटूंब एकत्र येऊन सण साजरा करतात. मात्र यामध्ये नवरा - बायकोची भांडणं होत असतात. याची नेमकी कारणे कोणती? आणि यावर उपाय काय? हे जाणून घेणार आहोत.

सणासुदीचा काळ खूप आनंद देणारा असतो. पण त्याचवेळी ‘फेस्टिव्ह स्ट्रेस’ नावाची समस्या कपल्ससाठी वाढतेय. घराची साफसफाई, सजावट, खरेदी, गिफ्टिंग प्रेशर आणि सोशल मीडियावर दिसणारे ‘परफेक्ट फॅमिली’ फोटो हे सगळं मानसिक ताण वाढवत असतं.

Festive Stress
Eyebrow Care: आयब्रो डार्क दिसत नाहीत? मग नॅचरल टिप्स फॉलो करा काहीच दिवसात जाणवेल फरक

फेस्टिव्ह स्ट्रेसची मुख्य कारणे:

कामाचा भार आणि थकवा

सणांची तयारी, घराची साफसफाई, सजावट ही सगळी थकवा आणि चिडचिडी वाढण्याची कारणे आहेत. जेव्हा पार्टनर्स एकमेकांना मदत करत नाहीत, तेव्हा भांडण किंवा चिडचिड होणंं स्वाभाविक आहे.

खर्चांचे मतभेद

शॉपिंग, गिफ्ट्स, डेकोरेशनमध्ये जास्त खर्चामुळे आर्थिक ताण वाढतो. एक पार्टनर बचत करण्याचा प्रयत्न करतो तर दुसरा खर्च करण्याची इच्छा बाळगतो. यामुळे तणाव वाढतो.

नातेवाईक आणि सामाजिक दबाव

“काय घालायचं?”, “कुठे जायचं?”, “कोणाला भेटायचं?” असे निर्णय कधी कधी भांडणाचे रूप घेतात. बाह्य अपेक्षा नातेसंबंधांवर दबाव आणतात.

वेळेची कमतरता

सणांच्या वेळी पार्टनर्स एकमेकांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे भावनिक अंतर वाढतं आणि तक्रारी वाढतात.

फेस्टिव्ह स्ट्रेसपासून बचावाचे उपाय

जबाबदाऱ्या एकत्र वाटून घ्या.

बजेट आधीच ठरवा आणि एकमेकांच्या मताचा आदर करा.

थोडा वेळ मिळून सोबत छोटे-छोटे आनंदाचे क्षण घालवा.

इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःची वास्तविकता स्वीकारा. काही कामांना ‘नाही’ म्हणायला शिका.

Festive Stress
Skin Care: ड्राय स्किनला करा Bye Bye! या ‘मॅजिक ऑईल्स’नी चेहरा होईल सॉफ्ट आणि ग्लोइंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com