Sakshi Sunil Jadhav
हिवाळा म्हणजे गारवा, पण त्याचबरोबर त्वचेसाठी काही त्रासही घेऊन येतो. या दिवसांत त्वचा खडबडीत आणि निस्तेज दिसू लागते. काही नैसर्गिक तेलांच्या नियमित वापराने तुम्ही ही समस्या सहज दूर करू शकता.
सरसोचं तेल थंड वाऱ्यांपासून त्वचेचं संरक्षण करतं. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे स्किन इन्फेक्शनपासून बचाव होतो आणि रक्ताभिसरण सुधारतं.
नारळ तेल हे तेल नैसर्गिक मॉइस्चरायझर म्हणून काम करतं.त्वचेला आतून पोषण देतं, कोरडेपणा कमी करतं आणि वृद्धत्वाची चिन्हं कमी करते.
विटामिन-ईने भरपूर असलेलं बदाम तेल कोरडी, खडबडीत त्वचा मऊ करतं. हे डार्क सर्कल्स कमी करून चेहऱ्याला उजळपणा आणतं.
तिळाचं तेल विटामिन A, B आणि E ने समृद्ध आहे. हे त्वचेतील टॉक्सिन्स बाहेर काढतं आणि सूर्यप्रकाश व थंड वाऱ्यांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेला बचाव करतं.
ऑलिव्ह ऑईल ड्राय स्किनसाठी एकदम योग्य पर्याय आहे. हे तेल त्वचेला खोलवर हायड्रेट करतं आणि सुरकुत्या कमी करून स्किनला युवा ठेवतं.
अंघोळीनंतर त्वचा थोडी ओलसर असताना तेल लावा. त्यामुळे मॉइस्चर लवकर शोषलं जातं आणि त्वचा जास्त वेळ मऊ राहते.
रोज रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने चेहऱ्यावर तेलाने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचा नैसर्गिकरीत्या चमकते.