Sakshi Sunil Jadhav
दिवाळी म्हणजे उत्सव, आनंद आणि देवी लक्ष्मीचं स्वागत करण्याचा सण. प्रत्येक घरात लक्ष्मीपूजनाची खास तयारी सुरू असते. देवीला आवडणाऱ्या वस्तू, सुवासिक फुले आणि पारंपरिक सजावट यातून श्रद्धा आणि सौंदर्य दोन्ही दिसून येतात.
कलशाच्या भोवती हिरवीगार खायची पानं लावल्याने तो अधिक पारंपरिक आणि शुभ दिसतो. या पानांचा हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक मानला जातो.
लक्ष्मी पूजनात कलशाभोवती रंगीत रांगोळी काढल्याने सकारात्मक उर्जा वाढते आणि लक्ष्मीचं आगमन मंगलमय होतं.
कमळ, झेंडू आणि गुलाबाची फुलं लक्ष्मीदेवीला प्रिय आहेत. ही फुलं कलशाभोवती आणि देवीच्या आसनावर ठेवा.
कलशाजवळ लहान दिवे लावा आणि सुगंधी अगरबत्ती लावा. या सुगंधाने वातावरण अधिक पवित्र आणि शांत होते.
पूजेत वेलची, लवंग आणि तांदळाचा समावेश केल्याने वातावरण सुगंधी होतं आणि सकारात्मकता वाढते.
घराच्या मुख्य दरवाजापासून पूजेच्या जागेपर्यंत लाल कुंकवाने लक्ष्मीचे पाय बनवा. हे देवीच्या आगमनाचं प्रतीक आहे.
कलशावर नारळ ठेऊन त्याभोवती पानं नीट मांडावीत. यामुळे कलशाचा सौंदर्य वाढतं आणि पूजन पूर्णत्वाला जातं.
लाल आणि सोनेरी रंग हे लक्ष्मीदेवीचे आवडते रंग आहेत. त्यामुळे पार्श्वभूमी किंवा पूजेचा भाग या रंगांनी सजवा.
कलशाजवळ चांदीची किंवा सोन्याची नाणी ठेवा. ही आरास समृद्धी आणि आर्थिक स्थैर्याचं प्रतीक मानली जाते.