Prevent Heart Attack: रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज होतील दूर, टळेल हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Plaque Reversal: फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुळे तयार होणारा प्लॅक कायमस्वरूपी नसतो. योग्य आहार, जीवनशैली बदल आणि advanced तपासण्या करून हार्ट अटॅकचा धोका कमी करता येतो, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
Plaque Reversal
Prevent Heart Attacksaam tv
Published On
Summary

रक्तवाहिन्यांतील प्लॅक कायमस्वरूपी नसतो.

हार्ट अटॅकचे कारण फक्त कोलेस्ट्रॉल नव्हे, तर soft plaque फुटणे आहे.

औषधांशिवायही आहार, व्यायाम आणि सूज नियंत्रणाद्वारे हार्ट निरोगी ठेवता येते.

अलीकडच्या काही वर्षांत हार्ट अटॅकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामागील एक मोठे कारण म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये तयार होणारा प्लॅक (Plaque) आहे. यालाच वैद्यकीय भाषेत "अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस " (Atherosclerosis) असे म्हणतात. यामध्ये तुम्हाला फॅट, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम आणि इतर पदार्थांच्या थरामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती घट्ट आणि अरुंद होतात. ज्यामुळे हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. हेच हार्ट अटॅकचे एक मुख्य कारण ठरते.

पूर्वी असे मानले जात होते की रक्तवाहिन्यांमध्ये एकदा प्लॅक तयार झाला की तो कधीही दूर होऊ शकत नाही आणि त्यावर फक्त औषधे, स्टेंट किंवा शस्त्रक्रिया याच मार्गाने उपचार करता येतात. मात्र न्यूयॉर्कमधील बोर्ड-प्रमाणित आपत्कालीन वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. वासिली इलिओपोलोस यांच्या मते, प्लॅक कायमस्वरूपी नसतो. योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे त्यावर नियंत्रण मिळवता येतं.

Plaque Reversal
Diabetes Fruits: डायबिटीज असलेल्या लोकांसाठी खुशखबर! हे फळ खा, ब्लड शुगरची काळजी सोडा

आपल्याला सांगितलं जातं की रक्तवाहिन्यांमधील प्लॅक कायमस्वरूपी असतो. पण ते पूर्णतः खरं नाही. स्टेंट किंवा शस्त्रक्रियेशिवायही धमनीतील प्लॅक कमी करता येऊ शकतो. त्याने स्पष्ट होतं की हार्ट अटॅकचे मुख्य कारण म्हणजे फक्त कॅल्शियमचे थर नव्हे, तर soft plaque फुटणे हे आहे. अनेकदा स्ट्रेस टेस्टमध्ये सर्व काही सामान्य दिसते, तरीही धोका कायम असतो. स्टेंटिंग किंवा शस्त्रक्रिया तात्काळ आराम देतात आणि जीव वाचवतात, पण त्या मूळ कारणावर उपचार करत नाहीत. त्यामुळे हृदयरोग टाळण्यासाठी मूळ कारणांवर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

हार्ट अटॅकचा खरा धोका ओळखण्यासाठी केवळ कोलेस्ट्रॉल रिपोर्ट पुरेसा नसतो. त्यासाठी advanced testing आवश्यक आहेत.

पहिली तपासणी म्हणजे APOB टेस्ट, जी शरीरातील खऱ्या लिपिड कणांचे प्रमाण मोजते.

दुसरी म्हणजे High-sensitivity CRP आणि LP-PLA2 टेस्ट, जी शरीरातील सूज (inflammation) मोजते आणि प्लॅक तयार होण्यास कारणीभूत घटक ओळखते.

तिसरी म्हणजे CCTA स्कॅन, जी धमनींमध्ये कुठे आणि कोणत्या प्रकारचा प्लॅक तयार होत आहे हे दाखवते. या तपासण्या वेळेत करून घेतल्यास मोठ्या हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव करता येऊ शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Plaque Reversal
Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com