Ganesh Festival Saam Tv
धार्मिक

Ganesh Festival : गणेशोत्सवात उंदीर मामा दिसला तर, 'हे' असतील शुभ-अशुभ संकेत

ज्योतिषशास्त्रानुसार गणेशोत्सवाच्या काळात उंदराचे दर्शन हे काही वेळा शुभ आणि अशुभ संकेत देतात.

कोमल दामुद्रे

Ganesh Festival : घरोघरी गणपतीचे आगमन झाले आहे. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा मोठ्या जल्लोषात गणपतीचे वाजतगाजत स्वागत होणार आहे. देशभरामध्ये गणेश चतुर्थीचा दिवस अतिशय खास असतो. प्रत्येक जण गणपती बाप्पा मोरया सोबतच उंदीर मामाकी जय म्हणतो. गणपतीसोबत (Ganpati) त्यांचे वाहन म्हणजे उंदीर मामाला विशेष महत्त्व आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार गणेशोत्सवाच्या काळात उंदराचे दर्शन हे काही वेळा शुभ आणि अशुभ संकेत देतात. उंदीर सामान्यतः घरांमध्ये आढळतात. प्रत्येकाला उंदरापासून मुक्ती मिळवायची आहे. कारण अनेक वेळा ते घरात ठेवलेल्या वस्तूंचेही नुकसान करतात, त्यामुळे घरात उंदीर दिसावे असे कोणालाच वाटत नाही. अशा स्थितीत गणेशोत्सवाच्या काळात उंदीर दिसला तर जाणून घ्या तो काय सूचित करतो.

१. उंदीर घराबाहेर निघून जाणे -

या दहा दिवसात उंदीर घराबाहेर जाताना दिसला तर ते शुभ चिन्ह आहे. म्हणजे उंदीर तुमच्या घरातील सर्व गरिबी आणि संकटे (Problems) दूर घेऊन जाईल. यानंतर घरात सुख-समृद्धी नांदेल, असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.

२. पांढऱ्या रंगाचा उंदीर -

या काळात तुम्हाला पांढऱ्या रंगाचा उंदीर दिसला तर हे शुभ संकेत आहे. पांढरा उंदीर सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो आणि त्याचं दिसणे म्हणजे तुमच्या घरातील सर्व संकटे नाहीसे होतील.

३. उंदराचे येणे ठरते नकारात्मक -

उंदीर दिसला तर चुकूनही मारू नये असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे. उंदीर घरात नकारात्मकता आणतो आणि घरातील सदस्यांची बुद्धी भ्रष्ट करतो. त्यामुळे या काळात दिवशी उंदीर दिसल्यावर त्याला मारू नका, तर पळवण्याचा प्रयत्न करा.

४. दिवसाढवळा उंदीर दिसला तर -

सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला उंदीर दिसला तर समजा तुमचे काही काम बिघडणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ही चिन्हे अशुभ मानली जातात आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होम लोन, कार लोन झालं स्वस्त; नवरात्रीआधी 'या' बँकेने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

iPhone 17 Series launch: खास डिझाइन, आकर्षक फिचर्स, iPhone 17 आज येतोय, किंमत किती असणार? VIDEO

Kajal Aggarwal : काजल अग्रवालच्या मृत्यूची अफवा, नेमकं काय आहे सत्य?

Zilha Parishad School : झेडपीच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला, दौंडमधील मेमानवाडीच्या शाळेची जोरदार चर्चा, मुलं जर्मन बोलतात... वाचा

SCROLL FOR NEXT