Manasvi Choudhary
मासिक पाळीच्या दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. कंबरदुखी, पोटदुखी, हार्मोनल बदल आणि थकवा येतो.
मासिक पाळी सुरू असताना महिलांच्या पोटात देखील वेदना होतात अशावेळी तुम्ही कोणती योगासने करावी हे जाणून घ्या.
जमिनीवर बसून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडा आणि गुडघे जमिनीच्या दिशेने झुकवा. पाठीचा कणा सरळ ठेवा.
गुडघ्यावर बसून पुढे वाका आणि कपाळ जमिनीला टेकवा. हात समोर सरळ ठेवा किंवा शरीराच्या मागे ठेवा.
हाताचे तळवे आणि गुडघे जमिनीवर टेकवून प्राण्यासारखे उभे राहा. श्वास घेत मान वर करा आणि पाठ खाली झुकवा, मग श्वास सोडत पाठ वर करा आणि मान खाली झुकवा.
जमिनीवर झोपून पायाचे तळवे एकमेकांना जोडा आणि गुडघे दोन्ही बाजूला पसरवा. पाठीच्या खाली उशी घेतल्यास अधिक आराम मिळतो.
पाठीवर सरळ झोपा, हात आणि पाय थोडे लांब ठेवा. डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या आणि शरीराच्या प्रत्येक भागाला शिथिल सोडा.