Gauri Pujan 2022 : आली गौराई अंगणी... जेष्ठागौरी मुहूर्त, पूजन व विसर्जन कसे कराल ?

गौराई अंगणी कधी येते ? जाणून घ्या शुभ मुहूर्त
Gauri Pujan 2022
Gauri Pujan 2022 Saam Tv
Published On

Gauri Pujan 2022 : गौरीला आदिशक्तीचे रुप मानले जाते. गौरीगणपतीचा सण महाराष्ट्रात अगदी मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा केला जातो.

गौरीली विशेष महत्त्व हे गणतीच्या (Ganpati) काळात प्राप्त होते. महाराष्ट्रात विविध जाती जमातीत, विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी तिला पूजले जाते.

पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठागौरी चे व्रत करतात.याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते.

Gauri Pujan 2022
Ganesh Chaturthi 2022 : गणपतीच्या या अवतारांबद्दल माहितेय का ? केला होता असूरांचा वध

कधी आहे ज्येष्ठागौरी आवाहन -

यंदा ज्येष्ठागौरी शनिवारी ३ सप्टेंबर २०२२ ला येत आहे.

ज्येष्ठागौरी आवाहन शुभ मुहूर्त - पहाटे ६.०३ पासून ते संध्याकाळी ६.३६ पर्यंत

ज्येष्ठागौरी पूजा मुहूर्त - ३ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपासून ४ सप्टेंबर रात्री ९.४० वाजेपर्यंत

गौरी विसर्जन मुहूर्त - ५ सप्टेंबरला दुपारी १२.२३ ते संध्याकाळी ७.२३ वाजेपर्यंत

हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात.

Gauri Pujan 2022
Ganesh Chaturthi 2022 : पार्वतीच्या मळापासून बनवलेल्या गणपतीला सोंडेचे रुप कसे मिळाले ? जाणून घ्या त्यामागची कथा

पहिल्या दिवशी गौरी आवाहन पूर्ण केल्यावर दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करतात. सकाळी गौरींची पूजा आरती करून बनवलेले फराळ जसे की रव्याचे लाडू, शंकरपाळ्या, शेव, करंजी, चकली इ. नैवेध्य दाखवावा. दुपारी पूरण पोळी, सोळा भाज्या एकत्र करून नैवेद्य ठेवतात. देवफळ, आंबड्याची भाजी, कडी, शेंगदाण्याची चटणी, डाळीची चटणी, पापड, भजी आदी बनवून नैवेद्य दाखवतात. सायंकाळी हळदी-कुंकूचा कार्यक्रम ठेवतात. माहेरवाशिणी आलेल्या गौरीला अगदी मनोभावे पूजतात. झिम्मा व फुगड्या देखील खेळल्या जातात.

तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते.

या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडल्या जातात. त्या सुतात हळदी, कुंकू, बेल फळ, झेंडूची पाने, झेंडूची फुले (Marigold), काशी भोपळा फूल, रेशमी धागा यांचे प्रत्येकी एक एक गाठ बांधून गाठी तयार केल्या जातात. गौरी महालक्ष्मीच्या ओठीत किंवा डोक्यावर हे ठेवले जाते नंतर गौरी महालक्ष्मीची आरती करून गूळ आणि गोड शेवयांचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन केले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com