Ganesh Chaturthi 2022 : पार्वतीच्या मळापासून बनवलेल्या गणपतीला सोंडेचे रुप कसे मिळाले ? जाणून घ्या त्यामागची कथा

या कथेचे वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणात आढळते. जाणून घ्या या कथेचे आणखी रहस्य.
Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022 Saam Tv
Published On

Ganesh Chaturthi 2022 : धार्मिक ग्रंथानुसार, गणेश चतुर्थी हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. यावेळी हा उत्सव ३१ ऑगस्ट, बुधवारपासून साजर होत आहे. श्री गणेशाशी संबंधित अनेक कथा धार्मिक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात.

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, एकदा नारदमुनी विष्णूंकडे पोहोचले आणि म्हणाले, हे देवा, महादेव सर्वांचे दुःख दूर करणार आहेत, तरीही त्यांनी प्रथम पूज्य श्री गणेशाचे (Ganesh) मस्तक का धडापासून का वेगळे केले? यामागे नेमके कारण काय होते जाणून घेऊया.

गणपती हा पार्वती देवीचा मळा पासून बनलेला पुत्र. पार्वती स्नानासाठी जात असताना प्रवेशद्वारापाशी थांबण्याची सूचना पार्वती देवीने गणेशाला केली. आईचा आदेश मानून गणपती दाराजवळ बसून राहिला. इतक्यात भगवान शंकर (Lord Shiva) तेथे आले. महादेवांनी आत जाण्याचा प्रयत्न केला असता, गणपतीने त्यांना अडवले. महादेवांनी हर तऱ्हेने गणपतीला समजावले.

Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022 : गणपतीच्या या अवतारांबद्दल माहितेय का ? केला होता असूरांचा वध

शेवटी पिता-पुत्रामध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. महादेवांनी त्रिशुळाचा जोरदार प्रहार गणपतीवर केला.​ महादेवांच्या त्रिशुळ प्रहारामुळे गणपतीचे मूळ शीर धडावेगळे झाले. काही वेळाने पार्वती देवी तेथे आली. गणपतीला पडलेले पाहुन अत्यंत क्रोधीत झाल्या व गणपतीला परत जिवंत करण्याची मागणी केली. शंकरांनी नंदी व अन्य गणांना जंगलात पाठविले. खूप पायपीट केल्यानंतर त्यांना अखेर एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक घेऊन ते शंकरांकडे आले. महादेवांनी हत्तीचे मस्तक त्या बालकांच्या धडाला जोडले आणि त्याला जीवनदान दिले.

महादेवाने मस्तक कापल्याची कथाही खूप गाजली. पण फार कमी लोकांना माहित असेल की एका शापामुळे शिवाला गणेशाचे मस्तकाचे शिर धडापासून वेगळे करावे लागले. या कथेचे वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणात आढळते. जाणून घ्या या कथेचे आणखी रहस्य...

Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022 : गणपतीच्या या अवतारांबद्दल माहितेय का ? केला होता असूरांचा वध

भगवान विष्णूंनी नारदमुनींना प्राचीन काळातील एक कथा सांगितली. एकेकाळी भगवान शिवाचे माली आणि सुमाली असे दोन परम भक्त होते. एकदा त्याचे सूर्यदेवाशी भयंकर युद्ध झाले. जेव्हा सूर्यदेवाचा पराभव होऊ लागला तेव्हा त्याने शिवाला हाक मारली. आपल्या भक्तांची हाक ऐकून महादेव लगेच तिथे आले. भगवान विष्णूंनी आपल्या भक्तांचे दु:ख पाहून महादेवाने आपला त्रिशूळ सूर्यदेवावर मारला, ज्यामुळे ते रथावरून खाली पडले. हे घडताच जगात अंधार पसरला. देवतांमध्ये आक्रोश झाला.

त्यावेळी सूर्यदेवाचे वडील महर्षी कश्यप यांनी आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून महादेवाला शाप दिला की, आज तुझ्या आक्रमणामुळे माझ्या मुलाची जी अवस्था झाली आहे, तशीच अवस्था तुझ्या हातून तुझ्या पुत्राची होईल. काही वेळाने महादेवाचा राग शांत झाल्यावर त्यांनी सूर्यदेवाचे चैतन्य परतवले. हे पाहून ऋषी कश्यपला आपल्या कृत्याचे फार वाईट वाटले. महर्षी कश्यप यांचा हा शाप महादेवाने स्वीकारला. या शापामुळे महादेवाला गणेशाचे मस्तक शिरापासून वेगळे करावे लागले. अशी कथा आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com