Diwali 2022  Saam Tv
धार्मिक

Diwali 2022 : दिवाळीत लक्ष्मी आणि गणेश मूर्ती खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

विशेषत: लक्ष्मी गणेशाची मूर्ती खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे.

कोमल दामुद्रे

Diwali 2022 : भारतात साजऱ्या केल्या जाणार्‍या प्रमुख सणांपैकी एक. दिवाळी हा सण अनेकांसाठी अत्यंत महत्त्वाचा. या दिवसात आपले घर लख्ख प्रकाशाने उजळून निघते.

घराबाहेर तोरण, अंगणात रांगोळी, आकाश कंदीलने सजवण्यापासून ते लक्ष्मी पूजेपर्यंत हा सण अगदी थाटामाटात साजरा (Celebrate) केला जातो. यावर्षी 24 ऑक्टोबरला दिवाळी आणि 23 तारखेला छोटी दिवाळी (Diwali) साजरी होणार आहे.

या दिवशी भगवान गणेश आणि लक्ष्मीची पूजा करणे हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत दिवाळीच्या पूजेसाठी भाविक लक्ष्मी आणि गणेशाच्या नवीन मूर्ती खरेदी करतात. (Latest Marathi News)

बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही प्रकारची मूर्ती घेण्यापूर्वी काही मुद्दे लक्षात ठेवावेत. जाणून घेऊया की लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Diwali

1. अशी असावी गणेशाची मूर्ती असावी

दिवाळीच्या पूजेला गणेशमूर्ती उभी असणे शुभ मानले जात नाही. त्याचबरोबर गणेशजींच्या सोंडेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घरासाठी गणपतीची सोंड उजवीकडे वाकलेली असेल अशी मूर्ती घ्यावी तर व्यापार्‍यांसाठी डाव्या बाजूला वळलेली सोंड चांगली मानली जाते.

2. खंडित झालेली मूर्ती नको

बाजारात गणेश आणि लक्ष्मीच्या अनेक मूर्तींची खरेदी-विक्री केली जाते. या दरम्यान अनेक वेळा मूर्ती एखाद्या ठिकाणाहून तुटतात. अशा स्थितीत तुम्ही जेव्हाही मूर्ती विकत घ्याल तेव्हा लक्षात घ्या की तुमची मूर्ती तुटलेली नसावी.

Ganpati and laxmi

3. मूर्तीचा रंग

माँ लक्ष्मीचा गुलाबी रंग हा तिचा आवडता रंग मानला जातो. अशा स्थितीत तुम्हीही अशीच मूर्ती घ्या ज्यासाठी गुलाबी रंगाचा वापर केला गेला असेल. तसेच ज्या मूर्तीवर काळ्या रंगाचा वापर केला आहे, त्या मूर्ती घेणे टाळावे. काळा रंग अशुभ मानला जातो.

4. कमळाचे फूल

कमळाचे फूल हे देवी लक्ष्मीचे प्रिय मानले जाते, त्यामुळे पूजेच्या वेळी कमळाचे फूल वापरले जाते. यामुळेच लक्ष्मीजी ज्या मूर्तीमध्ये कमळाचे फूल घेऊन बसलेली असते ती मूर्ती शुभ मानली जाते.

5. मूर्ती वेगवेगळ्या असाव्या

बाजारात गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती एकत्र आणि वेगळ्या जोडलेल्या आढळतात. एकत्र जोडलेल्या मूर्ती शुभ मानल्या जात नाहीत, म्हणून स्वतंत्र मूर्ती घेण्याचा प्रयत्न करा.

6. गणेशजींच्या हातात मोदक

मूर्ती खरेदी करताना गणेशाच्या हातात मोदक असावेत हे ध्यानात ठेवा. गणेशाची मोदक मूर्ती अतिशय शुभ मानली जाते. तर या काही टिप्स होत्या ज्यांची विशेषत: लक्ष्मी गणेशाची मूर्ती खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

Rashmika Mandanna Photos : "रूप तेरा मस्ताना..."; रश्मिकाच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

SCROLL FOR NEXT