Diwali Puja Muhurta 2022 : यंदाच्या दीपावलीत आहे खास योग; जाणून घ्या, लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

यावर्षी दिवाळी कधी साजरी होईल आणि लक्ष्मी पूजनाचा शुभ काळ आणि महत्त्व काय आहे.
Diwali Puja Muhurta 2022
Diwali Puja Muhurta 2022Saam Tv

Diwali Puja Muhurta 2022 : दिवाळी हा सण भारतातील सगळ्या सणापैकी महत्त्वाचा. हा सण अवघ्या ५ दिवसांचा असतो.देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी घर दिव्यांनी सजवल्यानंतर लक्ष्मी आणि गणेशाची एकत्र पूजा केली जाते. हा सण प्रामुख्याने प्रकाश, ज्ञान आणि संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.

दिवाळी दरवर्षी आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला येते. या दिवशी घर दिव्यांनी उजळते आणि कुटुंबासह माता लक्ष्मीची प्रार्थना करतात. दिवाळीत दिव्यांची ज्योत घरातील नकारात्मकता दूर करून प्रकाश पसरवते. (Latest Marathi News)

Diwali Puja Muhurta 2022
Diwali 2022 : दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केल्यास होईल प्रसन्न, पडेल पैशांचा पाऊस !

दिवाळीला (Diwali) धनाची देवता महालक्ष्मी, कुबेर, बुद्धीची देवता, गणेशाची विशेष पूजा केली जाते. या दिवशी माता सरस्वती आणि महाकाली यांचीही विशेष पूजा केली जाते. यावर्षी दिवाळी कधी साजरी (Celebrate) होईल आणि लक्ष्मी पूजनाचा शुभ काळ आणि महत्त्व काय आहे.

Diwali Puja Tithi 2022
Diwali Puja Tithi 2022Canva

दिवाळी पूजा 2022 तिथी (Diwali Puja Tithi 2022)

  • दिवाळीच्या दिवशी प्रामुख्याने गणपती आणि माँ लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे. असे मानले जाते की, या दिवशी पूजा केल्याने देवी लक्ष्मी वर्षभर घरात निवास करते आणि भक्तांवर आयुष्यभर आशीर्वाद देते.

  • या वर्षी पंचागानुसार आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला सोमवारी 24 ऑक्टोबर लक्ष्मी पूजन येत आहे. त्यामुळे या दिवशी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे.

Laxmi Pujan Muhurat 2022
Laxmi Pujan Muhurat 2022Canva

लक्ष्मी पूजन मुहूर्त 2022 (Laxmi Pujan Muhurat 2022)

  1. अमावस्या तिथी - 24 ऑक्टोबर 06:03 वाजता

  2. अमावस्या तिथी समाप्त - 24 ऑक्टोबर 02:44 वाजता

  3. लक्ष्मी पूजन मुहूर्त : संध्याकाळी ६:५४ ते रात्री ८:१६

  4. कालावधी: 1 तास 21 मिनिटे

Diwali Puja Muhurta 2022
Diwali 2022 : लक्ष्मी पूजनाच्या दिवशी असतो 'या' 5 गोष्टींना मान, आजच खरेदी करा !

दिवाळी शुभ चौघडिया मुहूर्त

  • सकाळचा मुहूर्त, 24 ऑक्टोबर, 06:34 ते 07:57 पर्यंत

  • सकाळचा मुहूर्त (चल, लाभ, अमृत): 10:42 ते 14:49 पर्यंत

  • संध्याकाळचा मुहूर्त (शुभ, अमृत, चल): संध्याकाळी 04:11 ते 20:49 पर्यंत

  • रात्रीचा मुहूर्त (लाभ): 24:04 ते 25:42 पर्यंत

लक्ष्मी पूजन का साजरे केले जाते ?

Laxmi devi
Laxmi deviCanva

लक्ष्मी पूजन प्रामुख्याने दिवाळीत केले जाते कारण या दिवशी आपण सर्व देवांचा आशीर्वाद घेतो आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. असे मानले जाते की, लक्ष्मी, संपत्तीची देवी, अतिशय क्षणिक आहे आणि जिथे कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि कृतज्ञता असते तिथे ती राहते.

लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच हा सण जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाचे धडे देतो. दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तानुसार लक्ष्मीची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

लंकापती रावणावर भगवान श्रीरामाचा विजय आणि 14 वर्षांचा वनवास संपवून घरी परतल्याच्या आनंदात हा सण साजरा केला जातो असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी घर दिव्यांनी सजवले जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com