Diwali 2022 : दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केल्यास होईल प्रसन्न, पडेल पैशांचा पाऊस !

या राशीनी दिवाळीत लक्ष्मीला लाल रंगाची चुनरी अर्पण केल्यास होतील अनेक फायदे
Diwali 2022
Diwali 2022 Saam Tv

Diwali 2022 : दिवाळी हा सण हिंदू सणापैकी एक आहे. हा सण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा दिवाळी ही २४ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून जेव्हा प्रभू श्रीराम आपल्या राज्यात परत आले, तेव्हा त्यांच्या आगमनाच्या आनंदात राज्यभर तुपाचे दिवे लावले गेले, जे संध्याकाळी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

हा सण केवळ एका धर्म आणि देशापुरता मर्यादित नसून शीख, बौद्ध आणि जैन धर्मातील लोकही मोठ्या उत्साहात साजरा करतात. भारताव्यतिरिक्त नेपाळ, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, फिजी, सिंगापूर आणि मॉरिशसमध्येही दिवाळीचा सण साजरा केला जातो. (Latest Marathi News)

Diwali 2022
Diwali 2022 : यंदाच्या लक्ष्मीपूजनाला प्रसादात ठेवा 'हे' पदार्थ

दिवाळी 2022 माँ लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय

  • जर तुमचे सर्व काम सतत बिघडत असेल तर हा उपाय तुम्ही दिवाळीच्या दिवशी अवश्य करा. एक रोटी बनवून त्याचे चार समान भाग करा, पहिला भाग गायीला, दुसरा भाग काळ्या कुत्र्याला आणि तिसरा भाग कावळ्याला खाऊ घाला. यानंतर, चौथा भाग सोडला, तो चौरस्त्यावर ठेवा. या उपायाने तुम्ही तुमचे काम सहजपणे करू शकाल.

  • दिवाळीच्या दिवशी विवाहित महिलेला जेवू घालून तिची ओटी भरा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला ऐश्वर्य, सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.

  • दिवाळीच्या (Diwali) दिवशी देवी लक्ष्मीला कच्चा हरभरा अर्पण करावा. त्यानंतर ते पिंपळाच्या झाडावर अर्पण करावे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहातो.

Diwali 2022
Diwali Shopping 2022 : दिवाळीत फ्लोरल कपड्यांसोबत सुंदर दिसतील 'या' अॅक्सेसरीजला, आजच खरेदी करा
  • दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला काळी हळद अर्पण करा आणि देवी लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर ती तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या तिजोरीत ठेवा. धनलाभ होण्यास मदत होईल.

  • याशिवाय दिवाळीच्या दिवशी चांदीच्या, तांब्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी भरून घराच्या ईशान्य दिशेला ठेवा. यामुळे घरातील सर्व आर्थिक संकटे दूर होतील आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होईल.

  • मीन रास असणाऱ्यांनी लाल रंगाची चुनरी देवी लक्ष्मीला दिवाळीत अर्पण करा कारण या काळात बृहस्पति मीन राशीवर राज्य करतो.यामुळे तुमचे वैवाहिक (Marriage) जीवन सुखी होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com