साम टिव्ही ब्युरो
दिवाळी हा सणांचा राजा. या दिवसात रांगोळी, उटण्याचा सुंगंध, फटाक्यांची आतषबाजी व सर्वत्र धामधूम असते. व सर्वत्र धामधूम असते.
आश्विन महिन्याच्या चतुर्थीला नरक चतुर्थीचा सण साजरा केला जातो.
या नरक चतुर्दशीच्या पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी ते फळ फोडण्याची परंपरा आहे.
मात्र हे फळ का फोडले जाते त्याचे कारण सहसा कोणाला ठाऊक नसेल तर माहीत करून घ्या.
चिरट हे भारतात सर्वत्र आढळणारे रानवेलीचे फळ आहे. जे नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते.
नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान कृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला.
यामुळेच नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नानाच्या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने हे फळ ठेचले जाते.
या फळातून बाहेर पडणारा रस हे नरकासुराच्या रक्ताचे रुपक आहे.
या फळास कारिंटे, कार्टे, चिरट, चिरटे, कोर्टी, चिर्डी, चिड्डी अश्या नावाने ओळखले जाते तर खेडेगावात चिभडं, शेरनी किंवा कर्टुलं या नावाने ओळखतात.