UCO Bank Job Saam Tv
naukri-job-news

UCO Bank Recruitment: युको बँकेत सरकारी नोकरीची संधी; १७३ पदांसाठी भरती; पगार ९३,९६०; अर्ज कसा करावा?

UCO Bank Recruitment 2026: युको बँकेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. युको बँकेत स्पेशलिस्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

Siddhi Hande

सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. युको बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. युको बँकेत जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या बँकेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

युको बँकेत सीए पदवीधरांसाठी नोकरीची संधी आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदावर काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.uco.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. वेबसाइटवर सर्व माहिती देण्यात आली आहे.

युको बँकेत ट्रेड फायानान्स ऑफिसर, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर, सिस्टीम अॅडमिन्स्ट्रेटर, क्लाउड इंजिनियर, सायबर सिक्युरिटी ऑफिसर, डेटा प्रायव्हसी, डेटा अॅनालिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सीए पदांसाठी ७५ जागा आहेत.

युको बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १३ जानेवारी २०२६ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करु शकतात. तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी अजून १५ दिवस उरले आहेत.

पात्रता

युको बँकेत एकूण १७३ पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. ट्रेड फायनान्स पदासाठी ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. एमबीए पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. त्यांच्याकडे १ वर्षांचा अनुभवदेखील असावा.चार्टर्ड अकाउंटंटसाठी ICAI मधून सीए असणे गरजेचे आहे. याचसोबत JMGS-I स्केलसाठी १ वर्ष आणि MMGS-II साठी ३ वर्षांचा अनुभव असावा. याचसोबत इतर पदांसाठी बी.ई/बीटेक/कंप्यूटर साइंस/इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन/एमसीए/एमएससी कॉम्प्युटर सायन्स केलेले असावे. याचसोबत १ ते ३ वर्षांचा अनुभव असायला हवा.

पगार

या नोकरीसाठी २० ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी JMGS-I पोस्टसाठी ४८४८०-८५९२० रुपये तर MMGS-II साठी ६४८२० ते ९३९६० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत डीए, एचएआरए आणि मेडिकल बेनिफिट मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : सांगलीत भाजपनं केला करेक्ट कार्यक्रम; ४ प्रभागांमध्ये भाजपच्या पॅनलमधील सर्व उमेदवार विजयी

Zilla Parishad Election: महापालिकेतील विजयानंतर भाजपचे सूर बदलले; जिल्हा परिषदेसाठी स्वबळाचा नारा

शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या मुलाचा दारुण पराभव, EVM वर घेतला आक्षेप |VIDEO

Pune Results : भाजपच 'दादा'! राष्ट्रवादीला जबरी धक्का, वाचा पुण्यातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी

CM देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; मामेभावाचा दारुण पराभव

SCROLL FOR NEXT