Air Force Recruitment: इंडियन एअर फोर्समध्ये नोकरीची संधी; अग्नीवीर वायू पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2026: भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एअर फोर्समध्ये अग्निवीर वायू पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Air Force Recruitment
Air Force RecruitmentSaam Tv
Published On
Summary

हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी

इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर वायू पदांसाठी भरती

पात्रता अन् अर्जप्रक्रिया वाचा

देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा अनेकांची असते. जर तुमचीही इच्छा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन एअर फोर्समध्ये अग्नीवीर वायु पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अग्निवीर वायु INTAKE 01/2027' या पदांसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे.

Air Force Recruitment
UIDAI Recruitment: UIDAI मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १,५१,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

हवाई दलातील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १२ जानेवारी २०२६ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.हवाई दलातील या नोकरीसाठी अविवाहित तरुण आणि तरुण सहभागी होऊ शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी iafrecruitment.edcil.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता

हवाई दलातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १२वी पास केलेले असावे, याचसोबत गणित, भौतिकशास्त्र, इंग्रजी या विषयात ५० टक्के गुण मिळवलेले असावे. याचसोबत मॅकेनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ कंप्यूटर सायन्स/ इंस्ट्रूमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा २ वर्षांचा व्होकेशनल कोर्स केलेला असावा.

Air Force Recruitment
Government Job: सरकारी नोकरीची संधी! सैनिक कल्याण विभागात भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? वाचा

अर्ज कसा करावा? (Application Process)

सर्वात आधी iafrecruitment.edcil.co.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर Online Registration For AGNIVEERVAYU INTAKE 01/2027 वर जायचे आहे.

यानंतर IAF Agniveer Vayu 01/2027 चा लॉगिन डॅशबोर्ड दिसेल. त्यावर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

यानंतर तुमची माहिती भरा. शैक्षणिक पात्रतेसंदर्भात कागदपत्र अपलोड करा.

यानंतर फोटो आणि सही स्कॅन करुन अपलोड करा. फॉर्म भरल्यावर त्याची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

Air Force Recruitment
Prasar Bharti Jobs: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com