TATA Job Saam Tv
naukri-job-news

TATA Job: टाटा कंपनीत नोकरी अन् भरघोस पगार; पात्रता पदवीधर; अर्ज कसा करावा?

Tata Institute Of Fundamental Research Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये नोकरी करण्याची चांगली संधी तुमच्याकडे आहे.

Siddhi Hande

चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, असं प्रत्येकालाच वाटत असतं. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये सध्या भरती सुरु आहे. क्लर्क ट्रेनी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

टाटा कंपनीत नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. याबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. तुम्ही tifrrecruitment.tifrh.res.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (Tata Institute Of Fundamental Research Recruitment)

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन सिलेक्शनद्वारे केली जाणार आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही कंपनी भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत येते. त्यामुळे तुमच्यासाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. यामध्ये क्लर्क ट्रेनी (अकाउंट्स) आणि क्लर्क ट्रेनी (अॅडमिनिस्ट्रेशन) पदासाठी अर्ज करु शकतात. एकूण ३८ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

टीआयएफआरमधील क्लर्क ट्रेनी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत कम्प्युटर अॅप्लिकेशन आणि टायपिंगचे ज्ञान असावे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २८ वर्ष असावी.क्लर्क ट्रेनी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २२००० रुपये पगार दिला जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कील टेस्टद्वारे केली जाणार आहे. (Government Job)

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये १८ नोव्हेंबर २०२४ रोजी वॉक इन सिलेक्शनद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १ होमी भाभा रोड, नवी नगर, कुलाबा, मुंबई ४००००५ या पत्त्यावर पोहचायचे आहे. तिथे त्यांची लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: शरद पवार गटाला धक्का; ऐन दिवाळीत मुरबाडमध्ये फुटणार बंडखोरीचे फटाके

Vidula Chougule: 'जीव झाला वेडापिसा' फेम अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहताच जीव गुंतला

Torna Fort : मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली, बाल वयातच महाराजांनी जिंकला किल्ला

Constipation: बध्दकोष्ठतेचा त्रास होईल छुमंतर; आहारात घ्या 'हे' ड्रायफ्रूट्स

कॅल्शिअमची कमतरता जाणवते? 'हे' पदार्थ देतील Immunity

SCROLL FOR NEXT