Karjat News : आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध सुधाकर घारे मैदानात, भव्य शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल

Karjat Khalapur Assembly Constituency : शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे मैदानात उतरेल आहेत.
आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध सुधाकर घारे मैदानात, भव्य शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल
Karjat Assembly constituencySaam Tv
Published On

कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी रोजी रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत येथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त कर्जत येथे घारे यांनी भव्य पदयात्रा काढत विराट शक्तिप्रदर्शन केले. या पदयात्रेला २० ते २५ हजार समर्थक यावेळी उपस्थित होते. यावेळी घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना थेट आव्हान देत त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली.

यावेळी कर्जत पोलिस ग्राऊंड येथील सभेत बोलताना सुधाकर घारे यांनी कर्जत खालापूरातील जनतेला माझा पक्ष तुम्ही आहात, माझे उमेदवार तुम्ही आम्ही आहात आणि आपल्याला तुमच्या आमच्या सहकार्याने ही निवडणूक लढवायची आहे, या मतदारसंघात आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. जे जे पक्ष सोबत येतील त्यांना सोबत घेऊन ही निवडणुक आपण लढणार असल्याचे घारे यांवेळी म्हणाले.

आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध सुधाकर घारे मैदानात, भव्य शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल
Chhagan Bhujbal: 'सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच', काका-पुतण्या संघर्षावर भुजबळांचा टोला

यावेळी बोलताना घारे म्हणाले, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, जेव्हा संकटाचा काळ होता. तेव्हा शिवाजी महाराजांनी एक एक मावळा निवडून स्वराज्याचे तोरण बांधले, आज आपल्याला देखील कर्जत खालापूरच्या विजयाचं तोरण बांधायचं आहे, असे घारे यावेळी म्हणाले.

सुधाकर घारे यांनी भाषणात आपल्यासोबत अनेक पक्ष येणार, अनेक अदृष्य शक्ती आपल्यासोबत असल्याचे सांगितले. मला तिकीट कुठून मिळेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र मला तिकीटाची आवश्यकता नाही. जनता माझ्या सोबत आहे, असे घारे म्हणाले.

आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध सुधाकर घारे मैदानात, भव्य शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल
Maharashtra Election: लाडक्या बहिणींचे भाऊ कोट्यधीश; कोणत्या नेत्याची किती संपत्ती? वाचा एका क्लिकवर

‘आमदार महेंद्र थोरवे यांची हूकुमशाही नष्ट करायची आहे’

सुधाकर घारे म्हणाले, आमदार थोरवे यांनी कोट्यवधींचा विकासनिधी आणल्याच्या वल्गना केल्या जात आहेत. गेल्या निडवणूकीच्या जाहीरनाम्यात थोरवे यांनी जी कामे करण्याचे आश्वासन दिले, त्यातील शुन्य कामे झाली असल्याचे घारे म्हणाले. कोंढाणे धरणाचे काम माजी आमदार सुरेश लाड यांनी मंजूर करुन घेतले. मात्र त्याचे श्रेय आमदार थोरवे लाटत आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांची हूकुमशाही नष्ट करायची आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com