Noel Tata : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झालेले नोएल टाटा नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर

Who Is Noel Tata : रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नोएल टाटा यांचं रतन टाटा आणि टाटा ट्रस्टशी नक्की काय नातं होतं, जाणून घेऊयात.
Noel Tata
Noel TataSaam Digital
Published On

भारतीय उद्योगविश्वात एक वेगळी छाप सोडलेल्या आणि भारतीयांशी उद्योगापेक्षा वेगळी नाळ असलेल्या रतन टाटा यांचं काल निधन झाला. त्यानंतर जगभरात १०० हून अधिक कंपन्यांचा डोलारा सांभळणाऱ्या टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांची नियुक्ती झाली आहे. नोएल टाटा हे नोएल एच.टाटा आणि सिमोन एन.टाटा यांचे पुत्र आहेत. सावत्र भाऊ रतन टाटा यांच्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. ज्यांच्या एकत्रितपणे टाटा सन्स या टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनीत ६६% हिस्सा आहे. ट्रस्ट्सने अद्याप उत्तराधिकार नेमण्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रतन टाटा यांच्या निधनानंतर ट्रस्ट्सच्या नेतृत्वावर मुद्दा उपस्थित झाला होता. भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक चॅरिटी संस्थांपैकी एक असलेल्या टाटा ट्रस्ट्सच्या संचालक मंडळाला विद्यमान विश्वस्तांमधून नवीन अध्यक्ष नियुक्त करावा लागेल, कारण रतन टाटा यांनी आपल्या मृत्यूपूर्वी कोणालाही उत्तराधिकारी घोषित केले नव्हते.

Who Is Noel Tata
Who Is Noel TataSaam Digital

कोण आहेत नोएल टाटा?

नोएल एन. टाटा सध्या टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्ष आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत आणि ते चार दशकांपासून टाटा समूहाचा भाग आहेत. त्यांच्याकडे टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे आहेत. ट्रेंट, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष आहेत. नोव्हेंबर 2021 पर्यंत ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते. जिथे त्यांच्या कार्यकाळात कंपनीचं उत्त्पन्न 500 दशल डॉलरवरून 3 अब्ज डॉलरवर पोहोचलं होतं.

Noel Tata
CM Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार, कुणाचं नाव देणार; एकनाथ शिंदेंनी सर्व काही सांगितलं!

नोएल टाटा यांना ट्रेंट लिमिटेडचा मोठा अनुभव आहे. जिथे त्यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलं. 1998 मध्ये एका स्टोअरपासून ते आज 700 हून अधिक स्टोअर्सपर्यंत त्याचा विस्तार केला. त्यांनी ससेक्स विद्यापीठातून (UK) पदवी प्राप्त केली असून INSEAD मधील आंतरराष्ट्रीय कार्यकारी कार्यक्रम (IEP) पूर्ण केला आहे.

परंपरेनुसार, टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष पारशी समाजातून असतात, ज्यामुळे संस्थेतील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाले आहेत. जर निवड झाली, तर नोएल सर दोराबजी टाटा ट्रस्टचे 11 वे अध्यक्ष आणि सर रतन टाटा ट्रस्टचे 6 वे अध्यक्ष होतील.

नोएल टाटा यांना यापूर्वी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार होते, परंतु शेवटी त्यांचे मेहुणे सायरस मिस्त्री यांची निवड झाली. मिस्त्री यांच्या वादग्रस्त निवृत्तीनंतर, त्या वेळी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) प्रमुख एन चंद्रशेखरन टाटा सन्सचे अध्यक्ष बनले. त्यांच्या पूर्वीच्या नात्यातील अंतर असूनही, नोएल आणि रतन टाटा यांचे अलीकडे पुनरुत्थान झाल्याचे सांगितले जाते, ज्यामुळे नेतृत्वामध्ये कुटुंबीयांचे संबंध सुधारले आहेत, असे TOI च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Noel Tata
Noel Tata: रतन टाटांचे उत्तराधिकारी ठरले, टाटा समूहाच्या नव्या अध्यक्षांची घोषणा; कोण सांभाळणार कोट्यवधींचे साम्राज्य?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com