एनआयटीमध्ये शिक्षण घेता यावे, अशी अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. जर तुम्हालाही एनआयटीमध्ये शिकायची संधी मिळाली नसेल तर काही हरकत नाही. सध्या एनआयटीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. तुम्ही एनआयटीमध्ये कान करु शकतात. डॉ. ही.आर. आंबेडकर राष्ट्रीय प्रोद्योगिकी संस्थान येथे फॅकल्टी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
एनआयटीमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. जालंधर येथे फॅकल्टी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही nitj.ac.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
एनआयटीमधील या नोकरीसाठी १३२ पदे भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे.
एनआयटीमध्ये सध्या असिस्टंट प्रोफेर ग्रेड II, असिस्टंट प्रोफेसर ग्रेड I, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेर या पदासाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
एनआयटीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६० वर्ष असावी. या नोकरीसाठी तुम्ही रजिस्ट्रार, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय प्रोद्योगिक संस्थाक, पोरेक कॅम्पस, जालंधर, पंजाब येथे अर्ज पाठवायचा आहे. (NIT Recruitment)
सध्या यूनियन बँकेतदेखील भरती सुरु आहे. लोकल बँक ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यूनियन बँकेत १५०० रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. पदवीधरांसाठी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. (NIT Recruitment 2024)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.