SSC Recruitment Saam Tv
naukri-job-news

SSC Recruitment: १२ वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये २००० पदांसाठी भरती;जाणून घ्या सविस्तर

SSC Stenographer Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २००६ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. १२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफर पदासाठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार लवकरात लवकर या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

स्टेनोग्राफ ग्रेड सी (Grade C) आणि ग्रेड डी (Grade D)साठी ही भरती आहे. या नोकरीसाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ssc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. या भरतीमध्ये एकूण २००६ पदे भरती केली जाणार आहे.

स्टेनोग्राफर पदासाठी भरतीप्रक्रियेत अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.स्टेनोग्राफर ग्रेड सी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष असावे. तर ग्रेड डी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष असावे.

स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवाराची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांना संगणक आधारित चाचणी (CBT) द्यावी लागणार आहे. या परीक्षेसाठी २ तासांची वेळ देण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर महिला , अनुसूचित जाती, जमातीतील व्यक्तींना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट आहे. या नोकरीसाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात घेतली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: 'महिनाभरापूर्वीच ओमराजेंच्या बंडाचं प्लॅनिंग', भावानेच केला मोठा गौप्यस्फोट

Mumbai Crime: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, तो भोसकत राहिला मुंबईकर बघत राहिले

ठाकरेंच्या ६ बंडखोर खासदारांबाबत पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी जमा? पाहा नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कर्कीसह अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस

SCROLL FOR NEXT