9 to 5 jobs : ९ ते ५ नोकरी लवकरच संपुष्टात येणार? Linkdinच्या सहसंस्थापकांची भविष्यवाणी व्हायरल

prediction on 9-to-5 jobs : Linkdinच्या सहसंस्थापकांची ९ ते ५ नोकऱ्यांबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या भविष्यवाणीवर सोशल मीडियावर भरभरून बोललं जात आहे.
९ ते ५ नोकरी लवकरच संपुष्टात येणार? Linkdinच्या सहसंस्थापकांची भविष्यवाणी व्हायरल
LinkedIn Job ReportSaam Tv
Published On

नवी दिल्ली : तुम्ही ९ ते ५ नोकरी करताय? तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. AI आणि टेक्नोलॉजीमधील बदलते स्वरुप यामुळे नवनवे प्रश्न उपस्थित होत आहे. या नोकऱ्यांवरून लिंक्डइनचे सहसंस्थापकांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. २०३४ सालापर्यंत ९ ते ५ वाजताच्या नोकऱ्या लवकरच संपुष्टात येणार आहे, असा खळबळजनक दावा लिंक्डइनच्या सहसंस्थापकांनी केला आहे.

लिंक्डइनचे सहसंस्थापक हॉफमॅन यांनी सांगितलं की, 'आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये मोठे बदल होत आहे. पारंपरिक नोकऱ्या संपुष्टात होणार आहेत. हॉफमॅन यांच्या म्हणण्यानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या विचार करण्याची पद्धत बदलली आहे. कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमध्ये बदल येण्याची शक्यता आहे'. तर हॉफमॅन यांच्या भविष्यवाणीवर नेटकरी भरभरून व्यक्त झाले आहेत. काही जण त्यांची भविष्यवाणी सत्य मानू लागले आहेत. तर काही जणांना या भविष्यवाणीबाबत शंका आहे.

९ ते ५ नोकरी लवकरच संपुष्टात येणार? Linkdinच्या सहसंस्थापकांची भविष्यवाणी व्हायरल
Government Job: महाराष्ट्र कृषी विभागात नोकरीची सुवर्णसंधी;या पदासाठी सुरु आहे भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

भारतीय-अमेरिकी उद्योजक नील तपारिया यांनी हॉपमॅन यांच्या भविष्यवाणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधील कॅप्शनमध्ये म्हटलं की, तुमची ९ ते ५ नोकऱ्या संपुष्टात येणार आहे. २०३४ सालापर्यंत सर्व नोकऱ्या संपुष्टात येतील'. त्यांनी पोस्ट करत हॉफमॅन यांच्या विधानाचाही संदर्भ दिला आहे. या पोस्टला आतापर्यंत १७ मिलियन्स जणांनी पाहिलं आहे. तर या पोस्टला ६१,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हॉफमॅन यांचे भविष्यवाणी खऱ्या ठरतात, असंही सांगितलं जातं.

तापरिया यांनी हॉफमॅन यांच्या तीन अन्य भविष्यवाणीविषयी लिहिलं आहे. हॉफमॅन यांनी १९९७ साली सोशल मीडियाविषयी भविष्यवाणी केली होती. त्यावेळी अनेकांना कल्पनाही नव्हती की, सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होईल. त्यांच्या इतरही भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. हॉफमॅन यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसविषयी भविष्यवाणी केली होती. 'आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे क्रांती येणार आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. तसेच चॅट जीपीटीवरही खूप आधीच भाष्य केलं होतं.

९ ते ५ नोकरी लवकरच संपुष्टात येणार? Linkdinच्या सहसंस्थापकांची भविष्यवाणी व्हायरल
Bank Job: जिल्हा परिषद बँकेत नोकरीची सुवर्णसंधी;१० वी आणि १२ वी पास उमेदवार करु शकतात अर्ज;जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

'कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमध्ये बदल होऊ शकतात. नव्या टेक्नोलॉजीमुळे काम करण्याची पद्धत बदलली जाणार आहे. आयटी क्षेत्र ते बँकिंग क्षेत्रातही मोठे बदल होतील. या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेंस जागा मिळवू शकतात, असेही त्यांनी सांगितले होते. हॉफमॅन यांनी अर्थव्यवस्थेवरही भाष्य केलं होतं. 'लोक भविष्यात नवी अर्थव्यवस्था निर्माण करतील, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांची भविष्यवाणी आता सत्यात उतरू लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com