Meta AI : रस्ता चुकलात? मेटा AI होणार तुमचा आधार, कसं काय? वाचा सविस्तर

Meta AI information : तुम्ही एकटे आहात. त्यानंतर कुठे अडकलेले आहात? तुम्हाला घरी परतण्याच मार्ग सापडत नाही तर तुम्हाला मेटा एआयची मदत मिळणार आहे.
रस्ता चुकलात? मेटा AI होणार तुमचा आधार, कसं काय? वाचा सविस्तर
Meta aiSaam tv
Published On

मुंबई : आता बहुतेक सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आले आहेत. व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकचा वापर लोक सर्रास करताना दिसतात. आता मेटा एआयला एक प्रमुख अपडेट देण्यात आलां आहे. यामुळे व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक युजर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. तुम्ही एकटे आहात आणि कुठे अडकलेले आहात? तुम्हाला मार्ग सापडत नाही तर तुम्हाला मेटा एआयची मदत मिळणार आहे.

Meta AI चॅटबॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp,Facebook आणि Instagram वर वापरला जात आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मवर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंग पूर्वीपेक्षा अधिक सोपी आणि मजेदार होणार आहे. मेटा एआयच्या मदतीनं तुम्हाला कुठल्याही प्रश्नाची उत्तर मिळणार आहेत.

रस्ता चुकलात? मेटा AI होणार तुमचा आधार, कसं काय? वाचा सविस्तर
Meta Gala 2024 : १६३ कारागीर, १९६५ तास...; मेट गालामध्ये आलिया भट्टची रॉयल एन्ट्री, हटके साडीची जगभर चर्चा

meta Ai ने खूप सारे पर्यात दिले आहेत. त्याच्या मदतीनं तुम्ही वाढदिवसाचे कार्डस, एखादी स्टोरी, तुमच्या घरी पाळीव प्राणी असतील, तर त्याचा food diet, work out idea असे एक ना अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्याची माहिती मिळवू शकता. मेटा एआयमुळे आपल्यासाठी एक असिस्टंटबरोबर घेऊन फिरतो, तो ज्या ज्या वेळी मला गरज असेल. तेव्हा मी त्याचा वापर करून मार्ग काढू शकतो. मेटा एआयच्या माध्यमातून एक रोबोटच आपल्यासोबत आहे, असं म्हणायला हरकत नाही.

रस्ता चुकलात? मेटा AI होणार तुमचा आधार, कसं काय? वाचा सविस्तर
Meta News : फेसबुक-इन्स्टामुळे मुलांचं मानसिक स्वास्थ्य संकटात; 41 राज्यांकडून 'मेटा'वर न्यायालयात खटला दाखल

बदल कसे दिसतील?

meta Ai चॅटबॉक्सच्या मदतीनं व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्रामचे युजर्स २२ भाषांमध्ये चॅटिंग, व्हिडिओ तसंच व्हॉईस कॉलिंग करू शकतात. हा चॅटबॉक्स आता नवीन भाषांमध्ये तुम्ही ज्या सूचना द्याल, ते स्वीकारण्यास सक्षम असेल. तुम्ही लिहून जे त्याला कमांड द्याल त्याला तो प्रतिसाद देईल. तसंच एआय चॅटबॉक्स स्थानिक भाषेतही उत्तरं देऊ शकेल. कंपनीकडून नवीन इमेज जनरेशन फिचर आणले जात आहे.

मेटा एआयचे वैशिष्ट्ये अर्जेंटिना, कोलंबिया, मेक्सिको, कॅमरून, चिली आणि पेरू या देशातही आणली जातील. चॅटबॉट जर्मन, फ्रेंच, हिंदी, इटालियन, पोर्तुगाल आणि स्पॅनिश भाषांमध्ये काम करेल. तसेच, येत्या काही दिवसांत Meta AI वैशिष्ट्यांमध्ये नवीन भाषा जोडल्या जातील.

प्रतिमा निर्माण करण्याचा पर्याय उपलब्ध

इमेज जनरेशन फीचरमध्ये, युजर इमेज डिटेल्ससाठी एआयला देईल किंवा इमेज अपलोड करून इमेज जनरेट करू शकतील. सध्या हे फीचर बीटा यूजर्ससाठी आणले गेले आहे. हा बीटा प्रोग्राम सध्या यूएसमध्ये आणला गेलाय. याशिवाय मेटा एआय इमेज एडिट करण्याचा पर्यायही दिला जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com