SIDBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SIDBI Recruitment: SIDBI मध्ये नोकरीची संधी, पगार मिळणार १,१५,००० रुपये; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

SIDBI Recruitment 2025: सिडबीमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ग्रेड ए आणि बी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियामध्ये (SIDBI Recruitment) नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सिडबीने ग्रेड १ आणि ग्रेड २ ऑफिसर पदांसाठी भरती काढली आहे. यासाठी त्यांनी अधिसूचना जाहीर केली आहे.

सामान्य आणि स्पेशलिस्ट पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रेड ए आणि ग्रेड बी अशा दोन्ही पदांसाठी ही भरती जाहीर जाहीर केली आहे. एकूण ७६ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पगार (Salary)

सिडबीमध्ये एकूण ७६ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर ग्रेड ए पदासाठी १००००० रुपये तर ग्रेड बी पदांसाठी १,१५,००० रुपये पगार मिळणार आहे.यामध्ये अनुभवानुसार किंवा पात्रतेनुसार पगार मिळणार आहे. संपूर्ण भारतात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती तुम्हाला www.sidbi.in या वेबसाइटवर मिळणार आहे.

अर्जप्रक्रिया (SIDBI Recruitment Application Process)

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात १४ जुलैपासून झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ११ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात.त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

निवडप्रक्रिया

या नोकरीसाठी उमेदवारांनी निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. लेखी परीक्षा ६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. फेज २ परीक्षा ४ ऑक्टोबह २०२५ रोजी होऊ शकते. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. नोव्हेंबरमध्ये इंटरव्ह्यू होऊ शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला सिडबीच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. तिथे करिअर या ऑप्शनवर क्लिक करा.त्यानंतर तुम्हाला ग्रेड ए आणि बी ऑफिसर पदांसाठी अर्ज करायची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करुन अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: वाशिमच्या रिसोड तालुक्यात दोन तास मुसळधार पाऊस

Hair Spa: हेअर स्पा करताय? तर थांबा, आधी 'हे' होणारे गंभीर परिणाम वाचाच

Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, पुण्यात घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

Pune Accident : पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली कार दरीत कोसळली

Janmashtami Baby Photos: मोरपिस व बासरीसह मुलांना द्या गोंडस कृष्ण रूप

SCROLL FOR NEXT