Gold Rate: सोनं २ लाखांवर पोहोचणार? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Sakshi Sunil Jadhav

अक्षय तृतीया

देशभरात आज अक्षय तृतीया साजरी केली. आजचा दिवस सोनं खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. या दिवशी घेतलेलं सोनं संपत्ती वाढवतं, अशी श्रद्धा आहे.

gold rate prediction

छोटे गुंतवणूकदार

छोटे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोनं-चांदीकडे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पाहत आहेत. तसेच सोन्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होत आहे.

gold rate prediction

एका वर्षात जबरदस्त रिटर्न

गेल्या अक्षय तृतीयेपासून आतापर्यंत सोन्याने तब्बल 63% परतावा मिळवला आहे. ही सध्याच्या काळातली सर्वात मजबूत तेजी मानली जाते.

gold rate India 2026

वाढीमागची प्रमुख कारणं

देशांमधील तणाव, केंद्रीय बँकांची खरेदी आणि गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे हे भाव वाढले. यामुळे सोनं दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जास्त महत्त्वाचं ठरत आहे.

gold rate India 2026

MCXची कामगिरी

MCX वर अक्षय तृतीया काळात सोन्याने नेहमीच सकारात्मक परतावा दिला आहे. 2020 ते 2026 दरम्यान 21% ते 63% पर्यंत मजबूत वाढ दिसून येत आहे.

gold rate India 2026

दीर्घकालीन गुंतवणुक

तज्ज्ञांच्या मते, सोनं हे सेफ आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणारं साधन आहे. पारंपरिक खरेदीच्या ट्रेंडनुसार याची लोकप्रियता कायम आहे.

gold rate India 2026

कंपाउंडिंगचा फायदा

2016 ते 2026 दरम्यान सोन्याने सुमारे 18% CAGR दिला आहे. कंपाउंडिंगमुळे दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण होऊ शकते.

gold rate India 2026

किंमतीत मोठी झेप

एप्रिल 2025 मध्ये 94,611 रुपये असलेला दर एप्रिल 2026 मध्ये 1,54,609 रुपये झाला. यामुळे सुमारे 60 हजार रुपयांची वाढ आणि 63% नफा मिळाला.

will gold reach 2 lakh

2 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता?

तज्ज्ञांच्या मते, पुढील अक्षय तृतीयेपर्यंत सोनं 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतं. ग्राहक आता जड दागिन्यांऐवजी नाणी, बार आणि हलक्या दागिन्यांना जास्त पसंती देत आहेत.

will gold reach 2 lakh

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

gold | pinterest

NEXT: लाखो युजर्ससाठी खुशखबर! डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...; Jioचा सर्वात भन्नाट रिचार्ज प्लान, किंम्मत किती?

NEXT : Jio Plan : फक्त ७७ रुपयांत जिओचा नवा प्लॅन; मिळणार ३ जीबी डेटा अन् बरंच काही
येथे क्लिक करा