

पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे आज सायंकाळच्या सुमारास चार ठिकाणी वीज पडली.
बनकर- माळी वस्ती येथे उसात वीज पडून उसाने पेट घेतला.
तर गावाशेजारील मुस्लिम कबरस्थान येथील
मिरीच्या झाडाजवळ वीज पडून तेथील कडबा पेटला.
जळकेवाडी येथील नारळाच्या झाडावर तर बाळू जगताप यांच्या आंब्याच्या झाडावर वीज पडली. यामध्ये झाडांचे नुकसान झाले.
नांदेड जिल्हयात आज सायंकाळी काही ठिकाणी आवकाळी पाऊस झाला .. जिल्ह्यातील नायगाव , धर्माबाद , उमरी आणि भोकर मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.भोकर तालुक्यात तेलंगणाच्या सीमेवर काही गावात तुरळक प्रमाणात गारपीट झाली.तर उमरी तालुक्यातील हुंडा तांडा येथे विज पडून बैलजोडी ठार झाली.सकाळ पासून जिल्ह्यात वातावरण सामान्य होत.सायंकाळी मात्र काही ठिकाणीं ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस झाला.येत्या 24 तारखे पर्यन्त नांदेड जिल्ह्याला उष्मालाट आणि आवकाळी पावसाचा हवामान खात्याने अलर्ट दिला.त्यामुळें जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीची शक्यता आ
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या इलेक्ट्रॉनिक म्युझिक कॉन्सर्टनंतर नवा प्रकार समोर
ड्रग्स प्रकरणानंतर आता मोबाईल चोरीचा मुद्दा चर्चेत
कॉन्सर्टमधून एकूण 6 महागडे iPhone चोरीला
चोरी झालेल्या फोनमध्ये iPhone 17, 16 Pro Max (2), 15 Pro Max, 14 Pro Max, 17 Air समाविष्ट
चोरी गेलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 3.40 लाख
4 तरुण व 2 तरुणींनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
पोलिसांकडून गुन्हा नोंद; तपास सुरू
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यासह आदिवासी भागात दरवषी आखाती गौराई सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो,निसर्ग पूजक अशी ओळख असलेल्या आदिवासी अक्षयतृतीय पूर्वी घरात विविध प्रकारची कडधान्य ऐका टोपलीत टाकत असतात, त्याचे अंकुर येण्यास सुरुवात होऊन रोज गौराई चे गीत गातात,अक्षयतृतीयेच्या दिवशी संध्याकाळी वाजत गाजत आदिवासी महिला डोक्यावर गौराई घेऊन गावभर पारंपारिक नृत्य करत नदीवर किंवा विहिरीवर जात मनोभावे गौराईचे विसर्जन करीत असतात.गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आज ही सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे
पोलीसांनी गडगेच्या आश्रमाची चार तास झाडाझडती
वडगावपान येथील दत्तधाम दरबारात स्पाॅट पंचनामा...
गडगेला मिळालीय पाच दिवसांची पोलीस कोठडी...
दाखल गुन्ह्यासंदर्भात पोलीसांचा तपास सुरू...
दरबारातील विविध औषधांचे नमुनेही घेतले ताब्यात..
भोंदू गडगेला वडगावपान येथील आश्रमात आणून झाडाझडती...
झाडाझडतीय अनेक आक्षेपार्य औषधे आणि वस्तू सापडल्याची माहिती...
अंनिसच्या पदाधिवारी तथा फिर्यादी रंजना गवांदे, आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थिती आश्रमाची तपासणी...
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा भीषण अपघात घडला.कौठा–गडगा मार्गावरील मानार प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील अरुंद पुलावरून एक कार थेट कालव्यात कोसळली. या अपघातात कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले.गडगा येथून कौठ्याकडे जाणारी कार एका कार्यक्रमावरून परतत होती. पुलाजवळ पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि कारने थेट कालव्यात कोसळली.पुल अत्यंत अरुंद असल्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले.कारमध्ये दोन महिला आणि एक पुरुष प्रवास करत हते.
हिंदू वर्षातील महत्वाचे साडेतीन मुहुर्तापैकी अक्षय तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व असतं. त्यानिमित्ताने श्री रूक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात आले आहेत. श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंच पेटी तांबडी, जव मणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोळ, सरी, कंबर पट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले.
राज्याचे आदिवाशी विकास मंत्री अशोक उईक यांच्या मतदारसंघातील यवतमाळच्या राळेगांव शहरासह तालुक्यात मानव तस्करी व 34 आदिवशी मुली बेपत्ता झाल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी केला.तद्नंतर भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील राळेगांव पोलीस स्टेशनवर घटनेतील सर्व संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धडक मोर्चा काढण्यात आला.
रायगडच्या तळा तालुक्यातील बोरीचा माळ येथील पुरातन लक्ष्मी नारायण मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून याचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी मंत्री भरत गोगावले, आ. तुकाराम काते आदी मान्यवर उपस्थित होते. तळ्यासारख्या दुर्गम भागातील ग्रामस्थांना विकासासाठी निधी देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.
सांगली जिल्हामध्ये गारांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया या सणाकडे बघितले जाते आणि या दिवशी खानदेशवासीय फार महत्त्व देत असतात, आणि याच दिवशी आपल्या परिस्थितीनुसार सोनं खरेदी करण्याची प्रथा पारंपारिक पद्धतीने चालत आलेली असून, आज देखील धुळ्यातील सोन्याच्या दुकानांमध्ये खान्देश वासियांची सोने खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी बघावयास मिळाली आहे.
TCS धर्मांतर प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. KR निदा खान हिने जामीनासाठी अर्ज दाखल केला असून या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडितेचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने जेजुरीच्या खंडेरायाला चंदन ऊटी लेप
उन्हाची तीव्रता वाढल्याने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला चंदन ऊटी लेप लावण्यात आला आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे चंदन हे त्याच्या शीतल गुणधर्मासाठी ओळखले जात आहे उन्हाची तीव्रता वाढल्याने देवाला थंडगारवा मिळावा यासाठी चंदनाचा लेप लावण्यात आला आहे त्या चंदन उटी लेप असे म्हटले जाते
अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच वादाची ठिणगी...
कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की...
स्वामी समर्थ मंदिर परिसरातील भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला राजकीय रंग...
श्रेयवादावरून आजी माजी आमदारांचे कार्यकर्ते भिडले...
भाजपाचा कोल्हे गट आणि राष्ट्रवादीचा काळे गट आमने-सामने...
भाजपचे विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीतच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की...
एकाच वेळी दोन गटांकडून भूमिपूजन आयोजनामुळे बॅनरबाजी आणि कार्यकर्त्यांमध्ये आमने-सामने भिडंत...
घटनेची माहिती मिळताच पोलिसांची तात्काळ धाव... परिस्थिती नियंत्रणात...
कोपरगावात राजकीय श्रेयवादाची लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता...
शिंदे साहेबांना विसरले ते घसरले, सोबत राहिले ते मोठे झाले
० मंत्री भरत गोगावले यांचे रायगडच्या तळ्यात मोठे विधान
० चेंबुरचे आमदार तुकाराम काते यांना मिळालेल्या आमदारकीचा विषय छेडताना गोगावले यांच विधान
० 22 मध्ये आम्ही उठाव केला त्यावेळी आमच्या सोबत सामिल झालात त्याच फळ तुम्हाला मिळाल
० उठावात समिल झालात तुम्हाला आमदारकी मिळाली नाहीतर आमदारकी तुमची गेली होती याची आठवण गोगावले यांनी कातेंना करून दिली
समृद्धी महामार्गावर झोपेची डुलकी लागल्याने चालत्या वाहनाला कंटेनरने मागून धडक देत अपघात केल्याची घटना घडली आहे. या धडकेत कंटेनरचा चालक अडकून गंभीर जखमी झाला. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील चॅनेल क्रमांक 178 वर कोलकत्याहून मुंबईकडे जात असताना हा अपघात झालाय...
वसई विरार शहराचा 36 अंशावर उष्णतेचा पारा वाढल्याने या वाहनाला अचानक लागल्याचे बोलले जात आहे.
विरार पूर्व-पश्चिम येथून मुंबई अहमदाबाद महामार्गाकडे
जाण्यासाठी अवैधरित्या या चार चाकी गाड्यांची वाहतूक केली जाते.
या दरम्यान विरारच्या चंदनसार येथून मुंबई अहमदाबाद महामार्गाकडे प्रवाशांना घेऊन जात होती त्याच दरम्यान ही घटना घडली आहे
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा येथील अंगणवाडीत लहान मुलांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
अंगणवाडीत बालकांना वाटप करण्यात येणाऱ्या मिलेट चॉकलेट पाकिटांमध्ये मोठ्या प्रमाणावर अळ्या आणि किडे आढळले. एका सतर्क महिला पालकाने हा प्रकार उघडकीस आणला.
उल्हासनगरमध्ये चोरट्यांनी थेट मंदिरालाच लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कॅम्प क्रमांक ३ येथील टाऊन हॉलसमोर असलेल्या पूज्य बाबा मंगतराम साहेब कुटिया या मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे १५ ते २० हजार रुपयांची चोरी करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच चढला असून भीषण उष्णतेची लाट जाणवत आहे. तापमानाने ४२ अंश सेल्सिअसची पातळी गाठल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत.
या उन्हात प्रवाशांना शहरातील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल लागल्यामुळे बराच वेळ थांबावे लागत होते.
उन्हाच्या तीव्र झळा आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य यामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल होत होते.
नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन,मा. पोलिस अधिक्षक श्री.नीलोत्पल सर यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून दुपारी सिग्नल बंद ठेवण्याची प्रक्रिया राबवून जनतेची ही मागणी रास्त मानून वाहतूक पोलिसांनी तातडीने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.
नाशिकच्या लासलगाव येथे अक्षय तृतीया निमित्त दत्त मंदिरात भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ,यावेळी भक्तांकडून तब्बल १५१ किलो आंब्याची मनमोहक आरास साकारण्यात आली आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती
- देशात सर्वाधिक तापमान म्हणून वर्धेची नोंद
- छत्तीसगड राज्याचे राजनांदगाव आणी महाराष्ट्राचा वर्धा ठरला सर्वाधिक तापमानाचा केंद्र
- वर्धेचे कालचे तापमान 45°C तर आजही पारा वाढतीवर
- राज्यातील जास्त तापमान वर्धा जिल्ह्यात नोंदविण्यात आलंय
- विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यात हिटवेव्हचा इशारा .
- पुढील 2 दिवस तापमानात वाढ होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात 34 आदिवासी मुली गायब झाल्याचे पुढे आहे त्यांची मानवी तस्करी केली जात असल्याचे माहिती हाती आली आहे
यात एक मुलगी आणि एक प्रियकर त्यांचा ऑडिओ क्लिप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांच्या हाती लागली आहे त्यात कश्या पध्दतीने मानवी तस्करी केली जाते हे सांगितलं जातं आहे.
देशभरात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आज नांदेडमध्ये देखील जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
नारीशक्ती वंदन अधिनियमाला काँग्रेसने विरोध केल्याच्या निषेधार्थ आज शहरात शिवसेना शिंदे गट वतीने निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, ऐतिहासिक क्रांती चौक येथे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. महिलांना हक्काचे आरक्षण देणाऱ्या विधेयकात खोडा घालून काँग्रेसने आपली महिलाविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे, अशी टीका राजेंद्र जंजाळ यांनी यावेळी केली.
-पाचव्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढच्या वेळी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं जाईल, तेव्हा आरोपीला न्यूरो सर्जनकडे देखील तपासणी करावी, अशी खरातच्या वकिलांची कोर्टाकडे मागणी आहे.
बारामती आणि २२३- राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवार, २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.. कंटेनर चालक यात जखमी झालाय पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्यानं, कंटेनर थेट सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता यांच्यामध्ये असणाऱ्या डिव्हायडरवर जाऊन पलटी झाल्याने हा अपघात झालाय..
एफेगअपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य करून जखमी चालकाला रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारीसाठी पाठवयं
समृद्धी महामार्ग लगत नवनगरे विकसित करण्याचा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बारगळला.
शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने MSRDC कडून नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प रद्द.
आता साकारली जाणार 15 इंटरचेंजवर विकास केंद्रे.
विकास केंद्रे विकसित करण्याचा प्रस्ताव सरकारला सादर.
लाडक्या बहिणींनी जसं महाराष्ट्रात योजनेत खोडा घातला तसंच त्यांना जोडा दाखवला. तसेच या देशामध्ये या लाडक्या बहिणीच्या विरोधामध्ये विरोधी पक्षांमध्ये ज्यांनी ज्यांनी विरोध केला. त्यांना धडा शिकवल्याशिवाय या देशातल्या लाडक्या बहिणी स्वस्त बसणार नाही.
शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने MSRDC कडून नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प रद्द.
आता साकारली जाणार 15 इंटरचेंजवर विकास केंद्रे.
विकास केंद्रे विकसित करण्याचा प्रस्ताव सरकारला सादर.
नेस्को कार्यक्रमातील एका सुरक्षारक्षकाला अटक
सुरक्षारक्षक नेस्कोचा कर्मचारी नसून थर्डपार्टी इव्हेंट organizer
याच सुरक्षारक्षकाला हाताशी धरून आयुष्य साहित्य याने विना तिकीट कॉन्सर्टमध्ये केला प्रवेश
सुरक्षारक्षकाला लाच दिल्याची माहिती समोर
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नांदेड जिल्ह्यात शेतीकामांना आजपासून सुरुवात झाली आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया निमित्त शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांचा शुभारंभ केल पारंपरिक श्रद्धा आणि नव्या हंगामाच्या आशा मनात ठेवत शेतकरी आज शेतात उतरले असून आगामी पेरणीसाठी शेतजमीन तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. नवीन हंगाम भरघोस जावो, अशी अपेक्षा व्यक्त करत शेतकरी कामाला लागले आहेत.
आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील संत गजाननाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली आहे. राज्यभरातून हजारो भाविक शेगावात दाखल झाले असून अक्षय तृतीयेनिमित्त संत गजानन महाराज चरणी लिन होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने शेगावात दाखल झाले आहेत.
65 वर्ष वय असलेल्या किशोर वासनिक यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय..
अमरावती चे तापमान काल 44 अंशाच्या वर गेल होत.
या रस्त्यावर वाहनाची वर्दळ असताना हा मृतदेह दिसून आला.
परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस दाखल.
बारामती - उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आज सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या असता त्यांना अनेक बारामतीकर भेटले. त्यांनी नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे चार वाहनांचा अपघात
स्टील भरलेल्या एका ट्रकने इतर वाहनाना ठोकर देऊन रस्त्यानजिकच्या विहिरीत कोसळला
सदर ट्रकचा चालक हा ट्रकच्या खाली असण्याची शक्यता आहे.
आज पहाटे घडला अपघात
ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस घटनास्थळी
महामार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे, बंदोबस्त मात्र महामार्गावर तौनात
बुलढाणा जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान 40 डिग्री पासून 42,43 डिग्री चे वर पोहचले आहे. . मागील महिन्यात तापमान हे 38 डिग्री पर्यंत गेले होते, मात्र एप्रिल महिन्यातच तापमानाची तीव्रता वाढली आहे . नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होताना दिसत आहे .. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने आपल्या अधिनस्त असणाऱ्या सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघाता कक्षाची स्थापना केलीय .. सुसज्ज असे हे कक्ष स्थापना करण्यात आले असून एका पथक सुद्धा प्रत्येक कक्षात तयार ठेवले आहे .. तर नागरिकांनी सुद्धा काळजी घेण्याने आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे
धाराशिव मधील नगरपरिषदेच्या छञपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या नुतनीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.याबाबत गेली अनेक वर्षापासून अखील भारतीय नाट्य परिषदेकडून मागणी केली जात होती अखेर या बाबत शासन निर्णय निघाल्यानंतर धाराशिव मधील छञपती शिवाजी महाराज चौकात अखील भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने फटाक्याची आतषबाजी करत लाडु वाटत जल्लोष केला.
- महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात आज SIT पुन्हा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करणार
- दरम्यान मोबाईल उघडल्यानंतर भोंदू खरातचे अनेक ‘डर्टी सिक्रेट्स’ समोर येण्याची शक्यता
- पुरावे नष्ट करण्यासाठी खरातने डिलीट केलेला मोबाईल डेटा फॉरेन्सिक टीमकडून रिकव्हर, सूत्रांची माहिती
- खरातने डिलीट केलेले चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती
- भोंदू खरात कोणाच्या संपर्कात होता? आर्थिक व्यवहारांचे पुरावे, मनी लाँड्रिंगचे कोड नंबर याचा उलगडा होणार
वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारी पूर्वीच एप्रिल महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत ५५५ मेट्रिक टन खतांच वितरण झाल्याने कृषि विभाग खडबडून जागा झाला,त्या पार्श्वभूमीवर जादा प्रमाणात खते विक्री केल्या प्रकरणी दोषी 13 कृषी केंद्र चालकांची सुनावणी घेण्यात आली होती... या सुनावणी दरम्यान 8 कृषि केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले असून,4 कृषी केंद्राना ताकीद देण्यात आली. तर एका कृषी केंद्राची पुनरचौकशी करण्यात येणार असल्याची माहिती वाशिम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा…
अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग दाखविण्यात आला. साडेतीन मुहूतार्पैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. याच दिवशी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.
आरोपी अयान अहमद वर गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 दिवसांतच त्याचे इंस्टाग्रामवर वाढले 4 हजार फॉलोअर्स.. आरोपी अयानचे इंस्टाग्राम पेज "ट्रेडिंगवर"...
गुन्हा दाखल होण्यापूर्वी होते 18 हजार फॉलोअर्स आता झाले 22 हजार झाले फॉलोअर्स..पोलीस तपासात माहिती उघड..
मागील सहा दिवसात अनेकांनी अयानचे इंस्टाग्राम पेज सर्च केल्याची माहिती...
आरोपी अयान अहमद हा सोशल मीडियावर सक्रिय असून तो इंस्टाग्राम वर अनेक ब्लॉग बनवत असल्याच समोर.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तहसील कार्यालया मार्फत श्रावण बाळ वृध्द योजना,संजय गांधी निराधार योजना लाभ सुरू ठेवण्यासाठी ह्यात प्रमाणपञ सादर केल्यावर अपेरिक्षातुन ढाकेफळ गावाकडे परतीच्या प्रवासात निघालेल्या वृध्द लाभार्थीची भरधाव रिक्षाचा ७४ जळगाव ते बोरगांव रोडवर अपघात होऊन ९ जण जखमी झाले. ढाकेफळ येथील काही वृध्द लाभार्थी सकाळी पैठण तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी गेल्यावर तिथे एका मध्यस्त दलाला मार्फत ऑनलाइन व ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वजण ढाकेफळ गावाकडे अपेरिक्षा क्रमांक (एम.एच.-२०-एस-०४८६) मधुन परतीच्या प्रवासात निघालेल्या रिक्षाचे टाकळी,बोरगाव ७४ जळगाव रोडवर एका ठिकाणी भरधाव रिक्षाचे चाकातील बेरींग खराब होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा रोडखाली एका खड्ड्यात पलटी झाली.असता शेतातील मंजूर, इतरांनी तात्काळ मदत कार्य करून जखमींना बाहेर काढून ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकेतून सर्व ९ जखमींना बिडकीन शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी मध्ये मारोती संपत शिरसाठ (८०), हौसाबाई विश्वनाथ शिंदे (७०), सरसाबाई काशिनाथ दळे (६७), केसरबाई अर्जुन मोरे (८०), द्रोपदाबाई देविदास कोल्हे (७५), सरसाबाई जनार्धन कोल्हे (७५), हौसाबाई मुरलीधर गोन्टे (७८), द्वारकामाई मारोती शिरसाट (७१) राजू यादव मोरे (३०) यांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा खाजगी दौरा असणार आहे. रायगडच्या तळा तालूक्यातील बोरीचा माळ येथे पुरातन श्री देवी लक्ष्मी मातेच्या मंदिराचा जिर्णोध्दार कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे रायगडमध्ये येत आहेत. बोरीचा माळ हे गाव शिंदेसेनेचे आमदार तुकाराम काते यांचे मुळ गाव असून काते यांच्या खास आग्रहास्तव शिंदे बोरीचा माळ येथे येत आहेत. गावच्या विकासासाठी ग्रामस्थ यावेळी शिंदे यांना निवेदन सादर करणार आहेत.
राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत.
नवी मुंबई शहरामध्ये अनाधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात सिडकोणी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे अशाच प्रकारे घणसोली या परिसरामध्ये अनाधिकृत मोठ्या प्रमाणात इमारती उभा केल्या जात आहेत त्यामुळे बांधकाम अनाधिकृत तोडण्याचं काम युद्धपातळीवर सिडकोणी सुरू केले त्यामुळे धडक कारवाई सिडकोणी सुरू केली आहे
मावळात सध्या निसर्गाने जणू पिवळ्या सोन्याची उधळणच केली आहे… बहाव्याच्या सोनसळी फुलांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. कडक उन्हाच्या झळा सहन करत असतानाच रस्त्याच्या कडेला फुललेला बहावा निसर्गप्रेमींना अक्षरशः भुरळ घालत आहे. एप्रिल-मे महिन्यात बहरणारा बहावा हा पिवळ्याधम्मक फुलांनी सजलेला देखणा वृक्ष… पानगळ झाल्यानंतर संपूर्ण झाडावर लोंबत्या पिवळ्या झुंबरांची चादर पसरते आणि परिसराला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त होतं. म्हणूनच याला इंग्रजीत ‘गोल्डन शॉवर ट्री’ म्हटलं जातं. विशेष म्हणजे, बहावा बहरला की साधारण ६० दिवसांत पावसाची चाहूल लागते, अशी आख्यायिका सांगितली जाते… त्यामुळेच बहावा ‘निसर्ग दर्शक’ म्हणूनही ओळखला जातो
यवतमाळच्या राळेगाव शहरात अल्पवयीन मुलींना बाहेर राज्यात विकणे,देह व्यापारासाठी वापरणे तसेच मानव तस्करीसारखा अतिशय गंभीर प्रकार असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी केला आहे.या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण तसेच तालुका व शहर पदाधिकाऱ्यांसह अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांची भेट घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.