Jobs Update : तरुणांसाठी खुशखबर! पॉवर ट्रान्समिशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता आणि पगार किती? जाणून घ्या

Jobs Update in Marathi : तरुणांसाठी नोकरीची खुशखबर हाती आलीये. पॉवर ट्रान्समिशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.
Jobs Update
Jobs Update in Marathi : Saam tv
Published On

तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. मध्य प्रदेशच्या पॉवर ट्रान्समिशन कंपनीमध्ये ६३३ पदांसाठी भरती होणार आहे. तर यूपीएससीनेही २४१ जागांसाठी भरती काढली आहे. या पदासाठी लागणारी पात्रता आणि महिन्याला पगार किती मिळणार, जाणून घेऊयात.

मध्य प्रदेशच्या पॉवर ट्रान्समिशन कंपनीमध्ये ६३३ पदांसाठी भरती होत आहे. मध्य प्रदेशच्या पॉवर ट्रान्समिशन कंपनीने असिस्टेंट इंजिनीअरसहित अन्य ६३३ पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवाराला कंपनीच्या mptransco.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

असिस्टेंट इंजिनीअर - ६३ पदे

लॉ ऑफिसर - १ पद

ज्युनिअर इंजिनीअर (ट्रान्समिशन) - २४७ पदे

ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल) - १२ पदे

लाइन अटेंडेंट - ६७ पदे

सबस्टेशन अटेंडेंट - २२९ पदे

सर्व्हेयर अटेंडेंट - १४ पदे

एकूण जागा - ६३३ पदे

Jobs Update
Maharashtra Police Transfers : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खांदेपालट; ५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

शैक्षणिक पात्रता काय?

संबंधित विषयात डिग्री, डिप्लोमा

वयोमर्यादा

किमान वय - १८

कमाल वय - ४० वर्ष

आरक्षित गटातील उमेदवारांसाठी वयात सूट देण्यात आली आहे.

पगार किती मिळणार?

१९,५०० - १,७७,५०० रुपये/ प्रति महिना

Jobs Update
Badlapur Shocking : धक्कादायक! बदलापुरात १३ व्या मजल्यावरून तरुण खाली कोसळला

यूपीएससीकडून काही जागांसाठी भरती

यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे यूपीएससीने सायंटिफिक ऑफिसरसहित २४१ पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. उमेदवाराला यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

शैक्षणिक पात्रता

पदवी, इंजिनीअर विषयातील पदवी

संबंधित पदाच्या कामाचा अनुभव

वय

किमान - ३० वय

कमाल - ५० वय

आरक्षित गटातील उमेदवारांना वयात सूट देण्यात आली आहे.

पगार

वेतन - आयोग ८ ते ११ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com