SBI Bank News  Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: स्टेट बँकेत नोकरीची संधी; मिळणार ८० लाखांचे पॅकेज; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर

SBI SCO Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीाठी निवड झाल्यावर तुम्हाला ८० लाखांचे पॅकेज मिळणार आहे.

Siddhi Hande

स्टेट बँकेत नोकरीची संधी

स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

८० लाखांचे पॅकेज मिळणार

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यात सरकारी बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रकिया सुरु झाली आहे.

स्टेट बँकेत बँक वाइस प्रेसिडेंट, डेप्युटी वाइस प्रेसिडेंट, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट अशा पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ५० वयोगटातील उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला पॅकेजदेखील चांगले मिळणार आहे.

बँकेत नोकरी केलेल्या अनुभव उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. या नोकरीबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करु शकतात. वाइस प्रेसिडंट (UX),डेप्युटी वाइस प्रेसिडेंट (UX), असिस्टंट वाइस प्रेसिडेंट (UX),सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह (UI&UX) या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. एकूण १२ रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बैचलर ऑफ डिजाइन/बीटेक/बी.ई की डिग्री कंप्यूटर साइंस/कंप्यूटर सायन्स अँड इंजीनियरिंग/ सॉफ्टवेयर इंजीनियरिंग/इनफॉर्मेशनट टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत त्यांच्याकडे ह्युमन फॅक्टर इंटरनॅशनल, गुगल UX/इंटरेक्शन डिजाइन फाउंडेशनचा UX चा कोर्स केलेला असावा.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बँकिंग, ई कॉमर्स, आयटी कंपनीत १५ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. वेगवेगळ्या पदांसाठी कामाचा अनुभव वेगवेगळा असावा. या नोकरीसाठी ५० वयोगटापर्यंत उमेदवार अर्ज करु शकतात.

८० लाखांच्या पॅकेजची नोकरी

स्टेट बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. ही भरती ५ वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. या नोकरीसाठी ४० ते ८० लाखांचे पॅकेज मिळणार आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी ६४,८२० ते ९३,९६० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी; कोर्टात काय झालं?

मुंबईतील लोकल ट्रेनची गर्दी २ महिन्यात कमी होणार; रेल्वे प्रशासनाने दिली महत्वपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: बीडच्या परळी नगर परिषदेच्या प्रशासनाला पडला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचा विसर

Vatana Batata Rassa Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी झणझणीत वटाणा-बटाटा रस्सा भाजी! पाहा ही सोपी रेसिपी

घरात टाकली धाड; 61 किलो चांदी अन् नोटांचा डोंगर पाहून पोलीस आयुक्तांचे डोळे झाले पांढरे

SCROLL FOR NEXT