SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती; १५१ पदांसाठी भरती; पगार ९३०००; जाणून घ्या सविस्तर

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत ऑफिसर होण्याची संधी आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. स्टेट बँकेने एकूण १५१ रिक्त पदांसाठी भरती काढली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (SBI Recruitmet 2025)

स्टेट बँकेच्या या नोकरीसाठी तुम्ही sbi.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि ट्रेड फायनान्स ऑफिसर (MMGS II) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

स्टेट बँकेत डेप्युटी मॅनेजरसाठी १ जागा रिक्त आहे. ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी १५० जागा रिक्त आहेत. एकूण १५१ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. (State Bank of India Job)

स्टेट बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

डेप्युटी मॅनेजर पदासाठी २७ ते ३७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी २३ ते ३२ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अनुभवाच्या आधारे पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ६४८२० ते ९३९६० रुपये पगार मिळणार आहे.

स्टेट बँकेच्या या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे. या नोकरीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT