PNB Recruitment: १२वी पास तरुणांसाठी पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी; पगार ६४०००; अर्ज कसा करावा?

Punjab National Bank Recruitment: पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पंजाब नॅशनल बँकेत ऑफिस असिस्टंट पदासाठी भरती सुरु आहे.
PNB Recruitment
PNB RecruitmentSaam Tv
Published On

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेत सध्या भरती सुरु आहे.पंजाब नॅशनल बँकेत कस्टमर सर्व्हिस असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. पंजाब नॅशनल बँकेच्या या नोकरीबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (PNB Recruitment 2025)

PNB Recruitment
RBI Jobs: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु; मिळणार भरघोस पगार; अर्ज कुठे अन् कसा कराल?

पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२५ आहे. या भरती मोहिमेत ९ रिक्त पदे भरली जाणार आहे. ही भरती स्पोर्ट्स कोटाअंतर्गत केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

पंजाब नॅशनल बँकेत कस्टमर सर्व्हिस असोसिएट (क्लर्क कॅडर) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२ वी पास असणे गरजेचे आहे. (Punjab National Recruitment 2025 )

PNB Recruitment
SBI Recruitment: स्टेट बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; ६०० रिक्त जागा; अर्ज कसा करावा?

कस्टमर सर्व्हिस असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षे असावे. ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षे असावे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड स्पोर्ट्स परफॉर्मन्स आणि फील्ड ट्रायलद्वारे केली जाणार आहे. शॉर्टिलिस्टिंग केलल्या उमेदवारांना फील्ड ट्रायलसाठी बोलावले जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

PNB Recruitment
Saraswat Bank Recruitment 2025: सारस्वत बँकेत नोकरी भरतीची मोठी संधी, 50 हजार ते 1 लाख पगाराची ऑफर

पंजाब नॅशनल बँकेतील कस्टमर असोसिएट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला २४,०५० ते ६४,४८० रुपये पगार मिळणार आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला १९,५०० ते ३७,८१५ रुपये पगार मिळणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरुन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर फॉर्म भरुन कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहे. चीफ मॅनेजर, मानव संसाधन प्रभाग, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेट कार्यालय, पहिला मजला, पश्चिम विंग, प्लॉट नंबर ४, सेक्टर १०, द्वारका, नवी दिल्ली ११००७५ येथे अर्ज पाठवायचा आहे.

PNB Recruitment
Government Job: डिजिटल इंडियामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com