RBI Jobs: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु; मिळणार भरघोस पगार; अर्ज कुठे अन् कसा कराल?

RBI Recruitment News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनियर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
RBI Jobs
RBI JobsSaam Tv
Published On

Reserve Bank Of India Recruitment: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँकेने ज्युनिअर इंजिनियर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

RBI Jobs
Digital India Job: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता पदवीधर;अर्ज कसा करावा?

रिझर्व्ह बँकेने या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. तुम्ही opportunities.rbi.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२५ आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचून घ्यावी.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्युनिअर इंजिनियर सिविल आणि ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रिकल पदासाठी भरती जाहीर केली आहे.एकूण ११ रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे. (RBI Recruitment 2025)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिविल/इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी इंजिनियरिंग केलेल्या उमेदवारांची निवड मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. तर डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना २ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

RBI Jobs
ONGC Job: परीक्षा नाही, थेट लाखोंच्या पगाराची नोकरी, ONGC मध्ये निघाली भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

रिझर्व्ह बँकेच्या या भरती मोहिमेत २० ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३३,९०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेची ही परीक्षा ८ फेब्रुवारी २०२४ आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

RBI Jobs
CIDCO Job: सिडकोमध्ये नोकरी अन् १७१००० रुपये पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com