SBI Recruitment: स्टेट बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; ६०० रिक्त जागा; अर्ज कसा करावा?

SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
SBI Recruitment
SBI RecruitmentSaam Tv
Published On

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून म्हणजेच २७ जानेवारीपासून सुरु होणार आहे. (SBI Recruitment)

SBI Recruitment
Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; महिना पगार १८००००; या पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सर्वकाही

स्टेट बँकेत ऑफिसर होण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्ही sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. २१ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. (SBI PO Recruitment)

स्टेट बँकेत ६०० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यातील १४ पदे ही बॅकलॉगसाठी आरक्षित आहेत. तर ५८६ पदे रेगुलरसाठी आहेत.

स्टेट बँकेतील प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी निवड ही परिक्षेद्वारे होणार आहे. प्रिलियम्स आणि मेन्स परिक्षेनंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यानंतर मुलाखतदेखील घेतली जाणार आहे. प्रिलियम परीक्षा मार्च महिन्यात होणार आहे. तर मेन्स परीक्षा ही एप्रिल किंवा मे महिन्यात होणार आहे. त्यानंतर मे किंवा जून महिन्यात मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. (SBI Jobs)

SBI Recruitment
NABARD Job: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी; स्पेशलिस्ट पदासाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला sbi.co.in या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर करिअर सेक्शनमध्ये जाऊन भरतीसंबंधित लिंकवर जाऊन क्लिक करा. त्यानंतर आवश्यक माहिती भरावी.यानंतर शुल्क जमा करुन फॉर्म सबमिट करा.

या भरतीसाठी अर्ज करताना तुम्हाला ७५० रुपये अर्जशुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

SBI Recruitment
Digital India Job: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता पदवीधर;अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com