Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची संधी! सैनिक कल्याण विभागात भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? वाचा

Sainik Kalyan Vibhag Bharti 2026: सैनिक कल्याण विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. लिपिक पदांसाछी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

Siddhi Hande

सैनिक कल्याण विभागात नोकरीची संधी

लिपिक टंकलेखक पदासाठी भरती जाहीर

अर्ज करण्याची मुदत वाढवली

सैनिक कल्याण विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे. सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत ही भरती जाहीर करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक (गट-क) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. सरळसेवेद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता तुम्ही ९ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करु शकतात. याबाबत मुंबई शहराचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहेत.

सैनिक कल्याण विभागातील भरतीसंदर्भातील जाहिरात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध होती. त्यानंतर ७ डिसेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली. यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे फॉर्म भरण्यास अडचणी येत होती. त्यानंतर आता पुन्हा ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना वेबलिंक किंवा प्रसिद्धी पत्रकारवरील क्यूआर कोड स्कॅन करुन अर्ज भरु शकतात. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरा.

चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती सरळसेवा परीक्षेद्वारे होणार आहे. याबाबतची अधिक माहिती अधिसूचनेद्वारे कळवण्यात येईल. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे ७ दिवस उरले आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात खासदार धानोरकर यांच्याकडून काँग्रेस नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन होणार

GST अधिकाऱ्याची आत्महत्या, 7 दिवसानंतर पत्नीचा खळबळ उडवून देणारा दावा

उधार घेतलेले 10000 रुपये कधी देणार? रागाच्या भरात सपासप वार, तरुणाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू असताना घातपाताचा कट उधळला; 'जैश'च्या दहशतवाद्याला कंठस्नान

Saturday Horoscope: गुंतवणुकीचा होईल फायदा, 4 राशींना होणार आर्थिक लाभ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT