SAI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SAI Recruitment: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार २.०९ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

SAI Recruitment 2025: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चीफ कोच पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

Siddhi Hande

स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी

चीफ कोच पदांसाठी भरती सुरु

खेळाची आवड असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. स्पोर्ट्स फील्डमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सध्या स्पोर्ट्स ऑथोरिटि ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्पोर्ट्स ऑथोरिटीमधील या नोकरीसाठी तुम्ही sportsauthorityofindia.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

तुम्हाला जर स्पोर्ट्समध्ये करिअर करायचे असेल आणि तुमच्याकडे अनुभव असेल तर ही खूप चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे पुढच्या महिन्याभरात इच्छुकांनी अर्ज करायचे आहे.

भारतीय खेळ प्राधिकरण विभागातील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १२ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. ११ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ६४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ७८८००- २०९२०० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता

स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी केंद्र सरकार/ राज्य सरकार/ सार्वजनिक संस्था किंवा स्वायत्त संस्था / विद्यापीठात काम केलेले असावे. याचसोबत ऑल्मिपिकमध्ये सहभागी झालेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. दरम्यान, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून खेळाशी संबंधित ३ वर्षांच्या कोचिंगचा अनुभव घेतलेला असावा. या नोकरीबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही अधिसूचना पाहू शकतात.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्ही sportsauthorityofindia.gov.in वर जा.

तिथे तुम्हाला चीफ कोच भरतीमध्ये अप्लाय ऑनलाइन असे दिसेल त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला ईमेल आयडी टाकून माहिती भरायची आहे.

यानंतर तुम्हाला तुमचे मार्कशीट, शैक्षणिक सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे.

यानंतर पासपोर्ट साइज फोटो आणि सही अपलोड करुन फॉर्म सब्मिट करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Transferred: दिल्ली पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS अधिकाऱ्यांसह ७० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ऐन धुळवडीत निवडणुकीचा धुरळा उडाला; आसामध्ये काँग्रेसकडून ४२ उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला कुठून संधी?

Maharashtra Live News Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

Wednesday Horoscope : संपत्तीवरून कुटुंबातील मतभेद उघड होणार; बुधवारी ५ राशींच्या लोकांची चिंता वाढणार

मुंबईत परप्रांतीय दोन तरुणांनी काढली विदेशी महिलेची छेड; पोलिसांनी बिहारमधून मुख्य आरोपीला घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT