महापालिका निवडणुकांचा बार उडाला! ‘या’ तारखेला मतदान, काही तासांत निकाल; उमेदवारी अर्ज कधीपर्यंत भरता येणार? VIDEO बघा

Maharashtra Municipal Elections Voting Date And Result: महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंत संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.

मुंबई, ठाणे,पुणे, नाशिक यासह इतर प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांचा बार उडाला आहे. राज्यातील प्रलंबित असलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, निकाल अवघ्या काही तासांत म्हणजेच 16 जानेवारीला लगेच लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. राज्यांतील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 मतदार मतदान करणार आहेत.

महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक

उमेदवारी अर्ज स्वाकीरणे - २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५

उमेदवारी अर्जांची छाननी - ३१ डिसेंबर २०२५

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत - २ जानेवारी २०२६

चिन्ह वाटप - अंतिम उमेदवार यादी - ३ जानेवारी २०२६

मतदान - १५ जानेवारी २०२६

निकाल - १६ जानेवारी २०२६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com