RBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती होणार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

RBI Recruitment 2025: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एक्सपर्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी

एक्सपर्ट पदांसाठी भरती

अर्ज कसा आणि कुठे करावा?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. एक्सपर्ट पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ६ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करु शकतात.

निवडप्रक्रिया

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in वर जाऊन अर्ज करु शकतात. रिझर्व्ह बँकेतील नोकरीसाठी उमेदवारांची निवड स्क्रिनिंग आणि शॉर्टलिस्टिंगद्वारे केली जाणार आहे. शॉर्टलिस्टिंग केल्यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाणार आहे. यानंतर उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाणार आहे.

या पदांसाठी भरती

डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनियर, आयटी सिक्युरिटी एक्सपोर्ट, आयटी सिक्युरिटी एक्सपोर्ट, आयटी सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर, आयटी प्रोजेक्ट अॅडमिनिस्ट्रेटर, एआय स्पेशलिस्ट, आयटी सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, ऑपरेशनल रिस्क अॅनालिस्ट, अॅनालिस्ट, रिस्क अॅनालिस्ट, पॉलिसी रिसर्च अॅनालिस्ट, डेटा अॅनालिस्ट, डेटा सायंटिस्ट अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुमच्याकडे संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभवदेखील असायला हवा.

अर्ज कसा करावा? (Application Process)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे.

यानंतर अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.

यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करा आणि तुमची सर्व माहिती भरा.

यानंतर तुम्ही लॉग इन करा आणि फॉर्म भरा.

यानंतर तुमची सही आणि फोटो अपलोड करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Food Combinations: दुधासोबत कोणते पदार्थ खाल्याने Acidity समस्या वाढते?

Cancer: महिलांच्या शरीरात हे बदल दिसले तर समजा कॅन्सर झालाय

Maharashtra Live News Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग!

Maharashtra Politics: पुण्यात भाजपनं पुन्हा खिंडार पाडलं, मविआचे अनेक दिग्गज नेते हाती घेणार 'कमळ'

महायुतीत जिथं ज्याचं बळ, तिथं स्वबळ? निकालानंतर बदललं बार्गेनिंग पॉवरचं गणित?

SCROLL FOR NEXT