Railway
Railway Saam Tv

RCF Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ५५० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

RCF Recruitment 2025: रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रेल्वे फॅक्टरी कोच कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अप्रेंटिस पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे.
Published on

रेल्वेत नोकरी करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते. तुम्हालाही नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

Railway
Government Job: १०वी पास आहात? सुरक्षा मंत्रालयाच्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करायचा?

रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही rcf.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

रेल्वे कोच फॅक्टरी ही रेल्वे मंत्रालयाची कंपनी आहे. या कंपनीत फिटर, वेल्डर, पेंटर, मेकॅनिस्ट, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर अशा विविध पदांसाठी अप्रेंटिस भरती सुरु आहे. तुम्हाला विविध ट्रेड्समध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

रेल्वे फॅक्टरी कोचमध्ये भरती (Railway Factory Coach Bharti)

रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे होणार आहे.

रेल्वेतील या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २४ असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

Railway
SAI Recruitment: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार २.०९ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला www.rcf.indianrailways.gov.in वेबसाइटवर जायचे आह.

यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर आयडी पासवर्ड तयार करा.

यानंतर वेबसाइटवर पुन्हा एकदा लॉग इन करायचे आहे.

यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे. याचसोबत १०वीचे मार्कशीट आयटीआय सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे.

यानंतर फोटो आणि सही अपलोड करुन अर्ज सबमिट करायचा आहे. अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

Railway
RBI Jobs: कोणतीही परीक्षा नाही थेट RBI मध्ये नोकरी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com