Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: १२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज कसा करावा?

RRB NTPC Recruitment: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत अंडर ग्रॅज्युएट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. तुम्हालाही जर रेल्वेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल्वेत सध्या अंडर ग्रॅज्युएशन एनटीपीसी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. रेल्वेत ३००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १२वी पास तरुणांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. रेल्वेत सरकारी नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

रेल्वे भरती बोर्डाने एनटीपीसी यूजीसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२५ आहे. इच्छुकांनी www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

रेल्वेच्या या भरती मोहिमेत ट्रॅफिक असिस्टंटस कमर्शियल क्लर्क कम टायपिस्ट, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

रेल्वेतील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १९९०० ते २५५०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर महागाई भत्तेदेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. तुम्हाला सीबीटी १ आणि सीबीटी २ परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये निवड झाल्यावरच तुम्हाला नियुक्त केले जाईल.

पात्रता

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास असणे गरजेचे आहे.त्यांनी १२वीत कमीत कमी ५० टक्के गुण मिळवलेले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना पात्रतेत सूट देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime : साताऱ्यानंतर हिंगोली हादरली, महिलेवर बलात्कार; पोलिसांची चूक वाचून संतप्त व्हाल

Maharashtra Live News Update: अखेर बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

Sanjay Shirsat: ४ वेळा आमदार राहिलो आता बस झालंं; महायुतीच्या मंत्र्याकडून निवृत्तीचे संकेत|VIDEO

Maharashtra Weather: अवकाळीचा तडाखा! मुंबईसह राज्यात पावसाचे तांडव, पुढील चार दिवस महत्त्वाचे, वाचा IMD चा अंदाज

Dnyanda Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी, दिसते चंद्राची कोर साजरी

SCROLL FOR NEXT