IRCTC New Rule: आता रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही; IRCTC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

IRCTC Rule Change in New Year: रेल्वेच्या नियमात पुढच्या वर्षीपासून महत्त्वाचे बदल होणार आहेत. आता तुम्हाला तिकीट बुकिंगची तारीख बदलण्यासाठी कोणतेही चार्ज देण्याची गरज नाही.
IRCTC
IRCTC Saam Tv
Published On

देशातील लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने लांबचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला आधीच तिकीट बुक करावे लागते. यासाठी आयआरसीटीसी अॅपचा वापर करतात. आयआरसीटीसीवरुन तुम्ही अवघ्या काही मिनिटात तिकीट बुक करतात. दरम्यान आता आयआरसीटीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आयआरसीटीसी पुढच्या वर्षी तिकीट बुकिंगच्या नियमात बदल करणार आहे. आता तुम्हाला तिकीट बुकिंगची तारीख बदलता येणार आहे.

IRCTC
Railway jobs : ग्रॅज्युएशन झालंय? रेल्वेत करा नोकरी, ५८०० जागांसाठी निघाली मेगा भरती, वाचा A टू Z माहिती

आता तुम्हाला तिकीट बुकिंगची तारीख बदलता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, तिकीट बुकिंगची तारीख बदलण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. सध्या तुम्हाला तिकीट रद्द करण्यासाठी शुल्क द्यावे लागते. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या तारखेचे तिकीट बुक करु शकत होता. दरम्यान, आता या नियमात बदल केले जाणार आहे. पुढच्या वर्षीपासून हा नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे.

सध्या तुम्हाला रेल्वेचं तिकीट बुक केल्यावर तारीख बदलण्याचा ऑप्शन दिसत नाही. दरम्यान, आता तुम्ही तिकीट कॅन्सल करुन नवीन तिकीट बुक करु शकतात. यासाठी तुम्हाला २५ ते ५० टक्के शुल्क भरावे लागते. जर तुम्ही ट्रेनच्या आधी १२ ते ४८ तासात तिकीट रद्द केले तर २५ टक्के शुल्क भरावे लागते. जर १२ तास आधी तिकीट कॅन्सल केले तर तुम्हाला ५० टक्के चार्ज द्यावा लागतो. दरम्यान, आता या नवीन नियमानुसार तुम्हाला तिकीटाची तारीख बदलण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही.

IRCTC
IRCTC New Rule : ट्रेन उशिराने आली, एसी बंद असेल तर तिकिटांचे पैसे मिळणार परत ; जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम

आता या नवीन नियमाबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, तुम्हाला आयआरसीटीसी वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करावे लागते. यानंतर जर तुम्हाला दुसऱ्या तारखेचं तिकीट बुक करायचे असेल तर तुम्हाला फक्त रेल्वे तिकीटाचे पैसे द्यावे लागणार आहे. कॅन्सलेशन चार्ज लागणार नाही.

IRCTC
IRCTC Down: IRCTC वेबसाइट डाउन, पेमेंट अडकलं; कधीपर्यंत पैसे परत येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com