

किन्ही गावाजवळ नागपूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात झाला.
उड्डाणपुलावर अचानक मोकाट जनावर आल्याने एका कारचालकाने ब्रेक लावला.
मागून आलेल्या कारने पुढील कारला जोरदार धडक दिल्याने वाहन तीन ते चार वेळा उलटले.
संजय राठोड, साम प्रतिनिधी
नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळच्या किन्ही गावाजवळ एक भीषण अपघात झालाय. महामार्गावरील उड्डाणपुलावर मोकाट जनावर अचानक आल्याने दोन कार एकमेकांना धडकल्या. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेल्या कारचा दरवाजा तोडून गावकऱ्यांनी तीन जखमींना बाहेर काढले.
महामार्गावर मोकाट जनावरे अचनाकपणे आल्यानं एका कार चालकाने कारचा ब्रेक लावला. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाने कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन तीन ते चार पलट्या खाल्ल्या.या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जीवन राठोड, अरुण देवक, गोलू कुलरकर, अथर्व गायधने, यश सोनटक्के, मोहन जाधव, सचिन मोहरकर आणि रघु राठोड यांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. रघु राठोड यांनी ग्रामीण पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघाताचा पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलीस करीत आहेत. या ठिकाणी यापूर्वीही मोकाट जनावरांमुळे अपघात झाले आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तीन विद्यार्थिनींचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिसबा जावेद शेख (वय १७, रा. संत चोखोबा वॉर्ड, आरोही अनुप चवरे (वय १६, रा. महात्मा फुले वॉर्ड, समृद्धी रूपक धामसे (वय १६) रा. संत गोमाजी वॉर्ड हिंगणघाट या तीन विद्यार्थिनी (एम एच ३२, ए डब्ल्यू ५७७९) क्रमांकाच्या दुचाकीने जात होत्या. दरम्यान दुचाकीचा ट्रॅव्हलची धडक होऊ हा अपघात घडला. या अपघातात तिघींचा जागीच मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.